भारतात उत्तर कोरिया, बांगलादेशपेक्षा भूकेची स्थिती वाईट, 119 देशांमध्ये भारत 100 व्या स्थानी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2017 09:14 AM2017-10-13T09:14:32+5:302017-10-13T09:17:35+5:30

भारतात राजकारणी विकासाचे दावे करत असले तरी, देशात उपाशीपोटी झोपणा-यांची संख्या कमी नाही. देशात भूकेची समस्या गंभीर असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.

India's hunger strike is worse than North Korea, Bangladesh, India is 100th in 119 countries | भारतात उत्तर कोरिया, बांगलादेशपेक्षा भूकेची स्थिती वाईट, 119 देशांमध्ये भारत 100 व्या स्थानी

भारतात उत्तर कोरिया, बांगलादेशपेक्षा भूकेची स्थिती वाईट, 119 देशांमध्ये भारत 100 व्या स्थानी

Next
ठळक मुद्देलहान मुलांचे कुपोषण, बाल मृत्यू दर, मुलांच्या विकासात अडथळे हे मुद्दे विचारात घेऊन भूक निर्देशांक काढला जातो. संपूर्ण आशियामध्ये फक्त अफगाणिस्तान आणि पाकिस्तान भारताच्या मागे आहेत. 

नवी दिल्ली - भारतात राजकारणी विकासाचे दावे करत असले तरी, देशात उपाशीपोटी झोपणा-यांची संख्या कमी नाही. देशात भूकेची समस्या गंभीर असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. 119 विकसनशील देशांचा जागतिक भूक निर्देशांकाचा अहवाल इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्चने प्रसिद्ध केला आहे. या यादीमध्ये भारत 100 व्या स्थानी आहे. भारत उत्तर कोरिया, बांगलादेश आणि इराकसारख्या देशांपेक्षाही मागे आहे तर, पाकिस्तानपेक्षा पुढे आहे.  

मागच्यावर्षी भारत 97 व्या स्थानी होता. लहान मुलांचे कुपोषण, बाल मृत्यू दर, मुलांच्या विकासात अडथळे हे मुद्दे विचारात घेऊन भूक निर्देशांक काढला जातो. या समस्येवर मात करण्यासाठी सामाजिक क्षेत्राने कटिबद्धता दाखवणे आवश्यक आहे असे  इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्चच्या अहवालात म्हटले आहे. 119 देशांच्या यादीत भारत 100 व्या स्थानी असून संपूर्ण आशियामध्ये फक्त अफगाणिस्तान आणि पाकिस्तान भारताच्या पुढे आहेत. 

31.4 सह भारत 2017 सालच्या ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये गंभीर श्रेणीमध्ये आहे. या यादीच चीन 29, नेपाळ 72, म्यानमार 77, श्रीलंका 84, बांगलादेश 88 व्या स्थानावर आहेत. पाकिस्तान 106 तर, अफगाणिस्तान 107 क्रमांकावर आहेत. ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये तुमच्या क्रमवारीत घसरण झाली तर, त्याचा अर्थ तुमच्या देशात भूकेची समस्या गंभीर आहे असा निघतो आणि क्रमवारीत वरच्या स्थानावर असाल तर, तुमच्याकडे परिस्थिती चांगली आहे. भारतापेक्षा श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश या तुलनेने गरीब असलेल्या देशात आज चांगली स्थिती आहे. 

Web Title: India's hunger strike is worse than North Korea, Bangladesh, India is 100th in 119 countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न