स्थैर्यासाठी भारत, अमेरिका जपानची भागीदारी अपरिहार्य
By Admin | Published: October 15, 2015 11:25 PM2015-10-15T23:25:21+5:302015-10-15T23:25:21+5:30
क्षेत्रीय स्थैर्यासाठी भारत, अमेरिका आणि जपानची नौदल सामरिक भागीदारी अपरिहार्य असल्याचा दावा जपानच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मलबार-२०१५ नौदल कवायतीचे महत्त्व स्पष्ट करताना केला आहे.
चेन्नई : क्षेत्रीय स्थैर्यासाठी भारत, अमेरिका आणि जपानची नौदल सामरिक भागीदारी अपरिहार्य असल्याचा दावा जपानच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मलबार-२०१५ नौदल कवायतीचे महत्त्व स्पष्ट करताना केला आहे.
सध्या येथे तीन देशांचा सहभाग असलेल्या नौदल कवायतींनी जगाचे लक्ष वेधले गेले असताना आयएनएस शिवालिक युद्धनौकेवर ते पत्रकारांना संबोधित करीत होते. त्यातून क्षेत्रीय स्थिर आर्थिक पर्यावरणाचे समान हित जपले जाते, असे अमेरिकेचे व्हाईस अॅडमिरल जे.पी. आॅकॉईन यांनी म्हटले.
जपानने व्यावसायिक क्षमता दाखवून दिली असून भविष्यातही या देशासोबत कवायतींमध्ये सहभाग नोंदविण्यास आम्ही उत्सुक आहोत, असे त्यांनी नमूद केले. (वृत्तसंस्था)