लष्करावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या टॉप 5 देशांत भारताचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2018 08:54 PM2018-05-02T20:54:19+5:302018-05-02T20:54:19+5:30

लष्करावर सर्वाधिक खर्च करणा-या टॉप ५ देशांच्या यादीत भारताचा समावेश झाला आहे. भारत आता अमेरिका आणि चीन यांच्या पंगतीत जाऊन बसला आहे.

India's involvement in top five countries in military spending | लष्करावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या टॉप 5 देशांत भारताचा समावेश

लष्करावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या टॉप 5 देशांत भारताचा समावेश

नवी दिल्ली : लष्करावर सर्वाधिक खर्च करणा-या टॉप ५ देशांच्या यादीत भारताचा समावेश झाला आहे. भारत आता अमेरिका आणि चीन यांच्या पंगतीत जाऊन बसला आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटने (सिप्री) जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. अहवालात म्हटले आहे की, २0१७ मध्ये भारताचा लष्करावरील खर्च ५.५ टक्क्यांनी वाढून ६३.९ अब्ज डॉलरवर गेला. भारताचा लष्करी खर्च आता फ्रान्सपेक्षा अधिक झाला आहे.

अहवालात म्हटले आहे की, जगाचा लष्करावरील खर्च अल्प प्रमाणात वाढून १.७३ लाख कोटींवर गेला आहे. हा खर्च जागतिक सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या २.२ टक्के आहे. लष्करावर सर्वाधिक खर्च करणा-या देशांत अमेरिका आणि चीनचा दबदबा कायम आहे. अमेरिकेचा लष्करावरील खर्च ६१0 अब्ज डॉलर तर चीनचा २२८ अब्ज डॉलर आहे.

सिप्रीने म्हटले की, चीन, भारत आणि सौदी अरेबिया यांचा लष्करावरील खर्च वाढल्यामुळे लष्करी समतोल आता आशिया, ओशिनिया आणि पश्चिम आशिया यांच्या बाजूने झुकला आहे. आशियात चीनचा लष्करी खर्च सर्वाधिक आहे. २0१७ मध्ये चीनचा लष्करी खर्च जागतिक लष्करी खर्चाच्या तुलनेत वाढून १३ टक्के झाला. २00८ मध्ये तो ५.८ टक्के होता. लष्करी खर्च वाढल्यामुळे चीनचा वृद्धीदर कमी झाला आहे.
...........................
वेतनावर अधिक खर्च
इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडीचे संशोधक लक्ष्मण कुमार यांनी सांगितले की, भारताचा लष्करी खर्च वाढला असला तरी वाढीव तरतुदीतील बहुतांश निधी वेतन आणि निवृत्ती वेतनावरच खर्च होत आहे. भारतीय लष्करात १.४ दशलक्ष सेवारत जवान असून २ दशलक्ष निवृत्ती वेतनधारक आहेत.

Web Title: India's involvement in top five countries in military spending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.