मोदींच्या व्यक्तीगत फायद्यामुळे देशाचे नुकसान - राहुल गांधी

By admin | Published: July 12, 2017 04:38 PM2017-07-12T16:38:38+5:302017-07-12T16:50:05+5:30

अमरनाथ यात्रेकरुंच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरुन काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे.

India's loss due to personal gain of Rahul - Rahul Gandhi | मोदींच्या व्यक्तीगत फायद्यामुळे देशाचे नुकसान - राहुल गांधी

मोदींच्या व्यक्तीगत फायद्यामुळे देशाचे नुकसान - राहुल गांधी

Next
ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. 12 - जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेकरुंच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरुन काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे. अल्पावधीसाठी राजकीय लाभ मिळवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणाने काश्मीरमध्ये दहशतवादासाठी जागा तयार केली असे राहुल यांनी म्हटले आहे. 
 
पीडिपी बरोबर आघाडी सरकार स्थापन करण्याच्या मोदींच्या निर्णयाची किंमत भारताला चुकवावी लागत आहे. मोदींच्या व्यक्तीगत फायद्यामुळे भारताचे रणनितीक नुकसान होत असून निष्पापांच्या रक्ताचा सडा पडत आहे अशा शब्दात राहुल गांधींनी मोदींवर टीका केली. 
 
सिक्कीममध्ये चीनबरोबर सुरु असलेल्या सीमा वादावरुनही राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. सिक्कीममध्ये चीनने केलेल्या अतिक्रमणावर मोदी गप्प का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दरम्यान दोन दिवसांपूर्वी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी चिनी राजदूत लुओ झुओई यांची भेट घेतल्यावरुन वाद झाला होता. आधी काँग्रेसने अशी कुठली भेट झाल्याच्या वृत्ताचा इन्कार केला होता. 
 
आणखी वाचा 
 
नंतर मात्र अचानत आपल्या भूमिकेवरुन यू-टर्न घेतला. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी चीनचे भारतातील राजदूत लुओ झुओई यांची भेट घेतल्याचे काँग्रेसने मान्य केले. राहुल गांधी यांनी फक्त चीनच नव्हे तर, भूतानचे राजदूत आणि माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार  शिवशंकर मेनन यांची भेट घेतली असे काँग्रेस प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी सांगितले.  
 
विविध देशांचे राजदूत वेळोवेळी काँग्रेस अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची भेट घेत असतात अशी सारवासारव सूरजेवाला यांनी केली.  शनिवारी राहुल गांधींनी लुओ झुओई यांच्या भेट घेतल्याच्या बातम्या येत होत्या. सुरुवातीला काँग्रेसने हे वृत्त खोटं असल्याचं सांगत अशी कोणतीही भेट झाली नसल्याचं सांगितलं होतं. विशेष म्हणजे दिल्लीमधील चीनी दुतावासाने यासंबंधी आपल्या वेबसाईटवर (http://in.china-embassy.org) टाकलेलं स्टेटमेंट नंतर डिलीट करुन टाकल्याचं वृत्त टाईम्स नाऊने दिलं होतं. राहुल गांधी यांनी लुओ झुओई यांची भेट घेत सध्या भारत आणि चीनमध्ये डोकलामवरुन सुरु असलेल्या वादावर चर्चा केल्याचं सांगण्यात येत होतं. काँग्रेसने मात्र ही बातमी खोटी असल्याचं सांगितलं होतं.

 

Web Title: India's loss due to personal gain of Rahul - Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.