भारत बनणार वैद्यकीय कचऱ्याचे आगार? 2020 पर्यंत रोज 775 टन कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 02:29 AM2018-03-24T02:29:16+5:302018-03-24T02:29:16+5:30
भारतात २०२२ पर्यंत रोज ७७५.५ टन वैद्यकीय कचरा निर्माण होण्याची भीती असल्याचा इशारा अॅसोचेम आणि व्हेलॉसिटी या संस्थांनी सर्वेक्षणाअंती दिला आहे. प्रभावी व सुरक्षित कचरा व्यवस्थापनासाठी कडक देखरेख ठेवण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत यात व्यक्त करण्यात आले आहे.
नवी दिल्ली : भारतात २०२२ पर्यंत रोज ७७५.५ टन वैद्यकीय कचरा निर्माण होण्याची भीती असल्याचा इशारा अॅसोचेम आणि व्हेलॉसिटी या संस्थांनी सर्वेक्षणाअंती दिला आहे. प्रभावी व सुरक्षित कचरा व्यवस्थापनासाठी कडक देखरेख ठेवण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत यात व्यक्त करण्यात आले आहे.
भारतीय औद्योगिक क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारी अॅसोचेम आणि व्हेलॉसिटी या संस्थांच्या अहवालानुसार दरवर्षी वैद्यकीय कचरा उत्सर्जित होण्याच्या प्रमाणात ७ टक्के वाढ होण्याची शक्यताही आहे. सध्या भारतात दरदिवशी ५५०.९ टन वैद्यकीय कचरा निर्माण होत आहे.
प्रदूषणमुक्त आरोग्यासाठी प्रभावीपणे काटेकोरपणे कचºयाचे व्यवस्थापन करणे जरुरी असल्याचे अहवालात नमूद केले आहे.
कचºयाचे सुरक्षित आणि प्रभावीपणे व्यवस्थापन करणे, कायद्याने जरुरी आहेच. ही सामाजिक जबाबदारीही आहे. गंभीर्य, प्रोत्साहन व जागरूकतेचा अभाव तसेच खर्च अशा कारणांमुळे जैव-वैद्यकीय कचºयाचे व्यवस्थापन करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. भारतात २०२५ पर्यंत कचरा व्यवस्थापनाची बाजारपेठ १३६.२० कोटी अमेरिकी डॉलरवर जाण्याची शक्यता आहे, असे दिल्ली सरकारच्या आरोग्यसेवा विभागाचे महासंचालक डॉ. कृती भूषण यांनी अहवाल मांडताना सांगितले.
वैद्यकीय कचरा व्यवस्थापन योग्यप्रकारे न झाल्यास सार्वजनिक आरोग्य धोक्यात येऊ शकते. जल, वायू व माती प्रदूषणाचाही विकसनशील देशांनी गांभीर्याने विचार करून त्या दृष्टीने पावले उचलण्याची गरज आहे.
तेव्हा कचरा आणि त्यापासून सार्वजनिक आरोग्यावर होणाºया परिणामांबाबत लोकांत जागरूकता निर्माण करण्याची आणि योग्य प्रकारे कचºयाची वेळीच विल्हेवाट लावण्याची गरज आहे. २०२० पर्यंत रोज ७७५ टन कचरा
या आजारांचा फैलाव होईल
कच-याच्या तकलादू व्यवस्थापनामुळे जल, वायू आणि मृदा प्रदूषण वाढू शकते. तसेच हिवताप, मुदतीचा ताप, पटकी, यकृतदाह यासारख्या रोगांचा प्रसार करणाºया विषाणूंचा फैलाव होऊ शकतो.