अग्नी 5 लवकरच सैन्याच्या ताफ्यात; संपूर्ण चीन आता भारताच्या टप्प्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2018 06:27 PM2018-07-01T18:27:21+5:302018-07-01T18:29:15+5:30

अग्नी 5 ची मारकक्षमता तब्बल 5 हजार किलोमीटर आहे

indias most potent missile agni v to be inducted soon china in range | अग्नी 5 लवकरच सैन्याच्या ताफ्यात; संपूर्ण चीन आता भारताच्या टप्प्यात

अग्नी 5 लवकरच सैन्याच्या ताफ्यात; संपूर्ण चीन आता भारताच्या टप्प्यात

Next

नवी दिल्ली : लवकरच भारतीय सैन्याच्या ताफ्यात सर्वात शक्तीशाली क्षेपणास्त्राचा समावेश आहे. आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र अग्नी-5 सुरक्षा दलांच्या ताफ्यात येताच भारताचं सामर्थ्य कित्येक पटींनी वाढेल. अग्नी 5 ची मारक क्षमता तब्बल 5 हजार किलोमीटर इतकी आहे. त्यामुळे संपूर्ण चीन भारताच्या टप्प्यात येईल. चीनच्या कोणत्याही भागाला लक्ष्य करण्याची क्षमता अग्नी 5 मध्ये आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 हजार किलोमीटरची मारक क्षमता असलेली अग्नी 5 ही क्षेपणास्त्र प्रणाली अण्वस्त्रदेखील वाहून नेऊ शकते. लवकरच अग्नी 5 स्ट्रॅटर्जिक फोर्सेस कमांडकडे सुपूर्द करण्यात येईल. देशातील अत्यंत आधुनिक क्षेपणास्त्र स्ट्रॅटर्जिक फोर्सेस कमांडकडे सोपवली जातात. मात्र याआधी अग्नी 5 च्या विविध चाचण्या घेतल्या जात आहेत. सुरक्षा क्षेत्रातील जाणकारांच्या माहितीनुसार, पेइचिंग, शांघाय, गुआंगझाऊ या शहरांसह चीनमधील कोणत्याही भागाला अग्नी 5 च्या माध्यमातून लक्ष्य केलं जाऊ शकतं.

गेल्या महिन्यात ओडिशाच्या किनारपट्टीवरुन अग्नी 5 ची यशस्वी चाचणी करण्यात आली होती. अग्नी 5 स्ट्रॅटर्जिक फोर्सेस कमांडकडे सोपवण्याआधी अशा आणखी काही चाचण्या घेतल्या जाणार आहेत. पुढील काही आठवड्यांमध्ये या चाचणी घेतल्या जातील. अग्नी 5 मुळे देशाच्या युद्धसज्जता कित्येक पटीनं वाढेल, असा विश्वास एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यानं व्यक्त केला. 'अग्नी 5 मधील नेव्हिगेशन यंत्रणा अतिशय अत्याधुनिक आहे. याशिवाय याची क्षमतादेखील इतर क्षेपणास्त्र प्रणालींपेक्षा कित्येक पटीनं जास्त आहे,' अशी माहिती या अधिकाऱ्यानं दिली. 
 

Web Title: indias most potent missile agni v to be inducted soon china in range

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.