भारत सर्वाधिक धर्मनिरपेक्ष देश - राजनाथ सिंह
By Admin | Published: March 3, 2016 05:58 PM2016-03-03T17:58:28+5:302016-03-03T18:16:19+5:30
जगात कुठला धर्मनिरपेक्ष देश असेल तर तो, भारत आहे. बहुविविधता असलेल्या या देशामध्ये सर्व धर्माचे लोक एकोप्याने एकत्र रहातात असे राजनाथ यांनी सांगितले.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - जगात कुठला धर्मनिरपेक्ष देश असेल तर तो, भारत आहे. बहुविविधता असलेल्या या देशामध्ये सर्व धर्माचे लोक एकोप्याने एकत्र रहातात असे राजनाथ यांनी सांगितले. राज्यसभेमध्ये केंद्रीय मंत्र्याने दिलेल्या प्रक्षोभक भाषणा विषयीच्या चर्चेमध्ये बोलताना त्यांनी हे सांगितले.
जगात भारत असा एकमेव देश आहे जिथे सर्व धर्माचे लोक एकत्र रहातात. इस्लाम, ख्रिश्चन धर्मासह सर्व धर्माच्या पंथाचे लोक इथे रहातात असे राजनाथ यांनी सांगितले. भारताची एकता आणि अखंडता टिकवण्यासाठी सर्व पक्षांना एकत्र येण्याचे त्यांनी आवाहन केले. फक्त एक पक्ष देशाची एकात्मता आणि अखंडता टिकवू शकत नाही. त्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र प्रयत्न करण्याची गरज आहे असे राजनाथ यांनी सांगितले.
केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री राम शंकर काथेरीया यांच्यावर कोणतीही कारवाई करणार नसल्याचे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. काथेरीया यांच्यावर आग्रा येथील कार्यक्रमात प्रक्षोभक भाषण दिल्याचा आरोप आहे. मी काथेरीया यांचे भाषण ऐकले, तुम्ही सुद्धा ते भाषण ऐका त्यात काहीही प्रक्षोभक नाही असे राजनाथ यांनी सांगितले. राजकीय फायदा-तोटयावर जातीय सलोख्याचे मोजमाप करु नका, न्याय आणि मानवतेच्या आधारावर त्याचे मोजमाप झाले पाहिजे असे राजनाथ यांनी सांगितले.