भारताचे ५० पेक्षा जास्त देशांशी सहमती करार, होमिओपॅथीचा जगभर होणार प्रसार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 07:25 AM2021-08-17T07:25:26+5:302021-08-17T07:25:49+5:30
homeopathy : आयुष मंत्रालयाने होमिओपॅथीतील सेंट्रल कॉन्सिल फॉर रिसर्चला भागीदार संस्थांशी ११ सहमती करारावर स्वाक्षरी करण्यास साह्य केले.
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारने पारंपरिक औषध व्यवस्था आणि होमिओपॅथीला जगभर आक्रमकपणे पोहोचविण्यासाठी ३१ देशांशी २५ सहमती करारांवर (एमओयु) स्वाक्षरी केली आहे. याचबरोबर सरकारने पारंपरिक औषधांवरील संशोधन आणि विकास परस्पर सहकार्याने करण्यासाठी अमेरिका, जर्मनी, इंग्लंड, कॅनडा व इतर देशांतील अनेक संस्थांशी ३१ सहमती करारांवर स्वाक्षरी केली आहे. आयुष मंत्रालयाने होमिओपॅथीतील सेंट्रल कॉन्सिल फॉर रिसर्चला भागीदार संस्थांशी ११ सहमती करारावर स्वाक्षरी करण्यास साह्य केले. या संस्थांत शारी झेडॅक मेडिकल सेंटर (इस्रायल), युनिव्हर्सिदाद मैमोनीदेस (अर्जेंटिना), कॉलेज ऑफ होमिओपॅथस ऑफ ओंतारिओ (कॅनडा), विस्सहोम- सायंटिफिक सोसायटी फॉर होमिओपॅथी (जर्मनी), फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ रिओ दि जानेरिओ (ब्राझील), नॅशनल सेंटर फॉर नॅचरल प्रोडक्टस रिसर्च (अमेरिका), होमिओपॅथिक फार्माकोपोएआ कन्व्हेशन ऑफ युनायटेड स्टेटस, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंटेग्रेटिव्ह मेडिसीन (ऑस्ट्रेलिया), इन्स्टिट्यूट फॉर द हिस्ट्री ऑफ मेडिसीन-रॉबर्ट बॉश्च फाउंडेशन (जर्मनी), रॉयल लंडन हॉस्पिटल ऑफ इंटेग्रेटेड मेडिसीन (इंग्लंड), नॅशनल स्कूल ऑफ मेडिसीन अँड होमिओपॅथी (मेक्सिको) फॉर इंटरनॅशनल प्रमोशन अँड प्रोपेगेशन ऑफ होमिओपॅथी यांचा समावेश
आहे.
आयुष अकॅडेमिक चेअर्स
हंगेरी, लाटविआ, बांगलादेश, रशिया, वेस्ट इंडीज, थायलंड, इंडोनेशिया, स्लोवेनिआ, अर्मेनिओ, अर्जेंटिना, मलेशिया, दक्षिण आाफ्रिकेतील संस्था व विद्यापीठांमध्ये आयुष अकॅडेमिक चेअर्सची स्थापना करण्यासाठी १३ सहमती करारांवर स्वाक्षरी केली आहे.