संरक्षण क्षेत्रात भारताची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल; मोदी सरकारचा 'मास्टर प्लॅन'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 08:36 AM2022-03-16T08:36:36+5:302022-03-16T08:36:59+5:30

जागतिक स्तरावर शस्त्र खरेदी आयातमध्ये एकट्या भारताची भागीदारी ११ टक्के इतकी आहे.

India's move towards self-reliance in the defense sector; Big plan of Modi government | संरक्षण क्षेत्रात भारताची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल; मोदी सरकारचा 'मास्टर प्लॅन'

संरक्षण क्षेत्रात भारताची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल; मोदी सरकारचा 'मास्टर प्लॅन'

Next

नवी दिल्ली – रशिया-यूक्रेन युद्धाचा(Russia-Ukraine War) आज २१ वा दिवस आहे. या युद्धाचे जगभरात परिणाम होताना पाहायला मिळत आहेत. बलाढ्य रशियानं यूक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेसह नाटो देशांनी यूक्रेनला शस्त्र पुरवठा सुरू केला आहे. याचवेळी भारताबाबत स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटनं सोमवारी एक रिपोर्ट जारी केला आहे. या रिपोर्टनुसार भारत शस्त्र खरेदी स्वावलंबी बनत असल्याचं समोर आलं आहे.

भारताने(India) शस्त्र खरेदीत रशियावर अवलंबून राहणं खूप मोठ्या प्रमाणात कमी केले आहे. २०१२-१७ या कालावधीत भारत एकूण शस्त्र खरेदीत ६९ टक्के आयात रशियातून करत होता. परंतु २०१७ ते २०२१ या कालावधीत या आकड्यात घट होऊन ४६ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटनं सोमवारी एक रिपोर्ट जारी करत दावा केला की, भारताने २०१७-२०२१ या कालावधीत एकूण आयात शस्त्र खरेदी २१ टक्क्यांनी घट केली आहे. जागतिक स्तरावर शस्त्र खरेदी आयातमध्ये एकट्या भारताची भागीदारी ११ टक्के इतकी आहे.

संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्याकडे पाऊल

२०१२-२०२१ या कालावधीत रशिया भारतासाठी सर्वात मोठा शस्त्र पुरवठादार होता. परंतु आता भारताने रशियाकडून होणारा शस्त्र पुरवठा आयात ४७ टक्क्यांनी कमी केला आहे. एसआयपीआरआयनुसार, भारत शस्त्र आणि आधुनिक हत्यारं या क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्याचा प्रयत्न करत आहे. त्याशिवाय भारत स्वत: शस्त्रांसाठी कुठल्याही एका देशावर निर्भर न राहण्यासाठी वाटचाल करत आहे. त्यामुळेच २०१७-२१ या काळात भारत फ्रान्स यांच्यात शस्त्र खरेदीत १० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

२०१२-२१ या काळात रशियाकडून इजिप्तच्या संरक्षण आयातीत ७३२ टक्क्यांनी वाढ झाली, तर याच कालावधीत चीनची रशियाकडून संरक्षण आयात ६० टक्क्यांनी वाढली. या काळात इजिप्त आणि चीन या दोन्ही देशांना रशियाकडून हवाई संरक्षण यंत्रणा आणि युद्ध विमाने मिळाली आहेत. अहवालानुसार, गेल्या दशकात भारत आणि रशियादरम्यान झालेल्या बहुतांश संरक्षण करारांमध्ये शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्यात आला आहे. मात्र, आठ हवाई संरक्षण यंत्रणा, चार फ्रिगेट्स आणि एक आण्विक पाणबुडी रशियाकडून भारताला देण्यात येणार आहे.

सीमेवरील तणावामुळे शस्त्रास्त्र उत्पादन वाढवण्याची योजना

चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर सततच्या तणावामुळे, भारत आपले शस्त्रास्त्रांचे उत्पादन वाढवण्याच्या तसेच विविध स्त्रोतांकडून आयात करण्याच्या दीर्घ योजना आखत आहे. भारताच्या एकूण शस्त्रास्त्रांच्या आयातीतील घट प्रत्यक्षात संथ आणि गुंतागुंतीची खरेदी प्रक्रिया आणि पुरवठादारांमधील बदलामुळे झाली आहे.

Web Title: India's move towards self-reliance in the defense sector; Big plan of Modi government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.