ओबामांच्या विधानावर भारताचा आक्षेप

By Admin | Published: April 4, 2016 09:41 PM2016-04-04T21:41:55+5:302016-04-04T21:41:55+5:30

जागतिक अण्विक सुरक्षेसाठी पाकिस्तानच्या बरोबरीने भारतालाही धोकादायक ठरवण्याच्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या वक्तव्यावर भारताने आक्षेप घेतला आहे.

India's objection to Obama's statement | ओबामांच्या विधानावर भारताचा आक्षेप

ओबामांच्या विधानावर भारताचा आक्षेप

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ४ - जागतिक अण्विक सुरक्षेसाठी पाकिस्तानच्या बरोबरीने भारतालाही धोकादायक ठरवण्याच्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या वक्तव्यावर भारताने आक्षेप घेतला आहे. 
 
ओबामा यांनी भारताची सुरक्षे संदर्भातील भूमिका समजून न घेता हे विधान केले आहे असे परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्त विकास स्वरुप यांनी सांगितले. 
 
पहिले अणवस्त्र न वापरण्याचे भारताचे धोरण असून, भारताने कुठल्याही शेजारच्या देशावर लष्करी कारवाई केलेली नाही. पहिले अणवस्त्र न वापरण्याच्या धोरणामुळे जगाला भारताच्या अणवस्त्र साठयापासून कुठलाही धोका नाही असे स्वरुप यांनी सांगितले. ओबामा यांनी अप्रत्यक्षपणे भारताला अणवस्त्र साठा कमी करण्यास सांगितले आहे. 

Web Title: India's objection to Obama's statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.