जागतिक बँकेच्या यादीत भारताचे स्थान घसरले

By admin | Published: October 30, 2014 01:36 AM2014-10-30T01:36:07+5:302014-10-30T01:36:07+5:30

‘व्यवसाय करण्यास सोपे’ या निकषावर जागतिक बँकेने केलेल्या 189 देशांच्या यादीत भारत 142 व्या पायरीवर आहे. बुधवारी बँकेने ही यादी प्रसिद्ध केली.

India's position on the World Bank list dropped | जागतिक बँकेच्या यादीत भारताचे स्थान घसरले

जागतिक बँकेच्या यादीत भारताचे स्थान घसरले

Next
189 देशांची यादी : भारत 140 व्या स्थानावरून 142 व्या स्थानी
वॉशिंग्टन : ‘व्यवसाय करण्यास सोपे’ या निकषावर जागतिक बँकेने केलेल्या 189 देशांच्या यादीत भारत 142 व्या पायरीवर आहे. बुधवारी बँकेने ही यादी प्रसिद्ध केली. त्यानुसार भारत गेल्या वर्षी 14क् व्या क्रमांकावर होता. 
सिंगापूर यावर्षी पहिल्या क्रमांकावर आहे. इतर देशांनी प्रभावी कामगिरी केल्यामुळे भारत 2 पाय:या खाली आला आहे, असे बँकेच्या अधिका:यांनी सांगितले. देशांचे स्थान ठरवताना बँकेने नरेंद्र मोदी सरकारने व्यवसायाला अनुकूल वातावरण व्हावे यासाठी जी उपाययोजना केली तिचा विचार केलेला नाही.
जागतिक बँक समूहाचे संचालक (ग्लोबल इंडिकेटर्स ग्रुप) ऑगस्टो लोपेज-क्लारोज म्हणाले की, भारताचे स्थान घसरण्याशी सध्याच्या सरकारचा काही संबंध आहे, असे आम्हाला सुचवायचे नाही. 
मोदी सरकारने देशात परकीय गुंतवणुकीसाठी उत्तम वातावरण आणि व्यापारासाठी योग्य परिस्थिती निर्माण करण्यास आमचे सर्वोच्च प्राधान्य असेल असे आधीच स्पष्ट केले आहे. तथापि, हेही लक्षात घ्यायची गरज आहे की नवे सरकार मे महिन्याच्या दुस:या पंधरवडय़ार्पयत सत्तेत आलेले नव्हते. (वृत्तसंस्था)
 
च्यावर्षीच्या यादीत सिंगापूरचा क्रमांक पहिला, तर न्यूझीलंड, हाँगकाँग, डेन्मार्क व दक्षिण कोरियाचा क्रमांक लागतो.
च्ब्रिटन 8, चीन 9क्, श्रीलंका 99, नेपाळ 1क्8, मालदीव 116, भूतान 125 व पाकिस्तान 128 व्या क्रमांकावर आहे.
च्भारताचे स्थान यंदा भलेही खाली आले असले तरी गेल्या 12 महिन्यांत व्यापार करण्यास वातावरण सुधारले आहे, असेही लोपेज म्हणाले.

 

Web Title: India's position on the World Bank list dropped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.