एक गाडी बाकी अनाडी; राष्ट्रपतींची १२ कोटींची कार म्हणजे जणू चमत्कार!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 02:15 PM2018-10-01T14:15:35+5:302018-10-01T14:23:52+5:30

आज भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा 73 वा वाढदिवस आहे. एका गावातून आलेले कोविंद आज 12 कोटींच्या कार मधून फिरत आहेत.

India's President car; not only bullet....missile also not impact on this 12 crore car | एक गाडी बाकी अनाडी; राष्ट्रपतींची १२ कोटींची कार म्हणजे जणू चमत्कार!

एक गाडी बाकी अनाडी; राष्ट्रपतींची १२ कोटींची कार म्हणजे जणू चमत्कार!

Next

नवी दिल्ली : आज भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा 73 वा वाढदिवस आहे. 1 ऑक्टोबर 1945 मध्ये कोविंद यांचा जन्म कानपूरच्या एका छोट्याशा परौख या खेड्यात जन्म झाला. कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी दिल्लीच्या उच्च न्यायालयामध्ये वकीली करण्यास सुरुवात केली. यानंतर ते काही वर्षे केंद्र सरकारचेही वकील म्हणून काम पाहिले. एका गावातून आलेले कोविंद आज 12 कोटींच्या कार मधून फिरत आहेत. ही देशातील सर्वात सुरक्षित आणि महागडी कार आहे. कोविंद जगात जेथे जेथे जातात ही कार सतत त्यांच्यासोबत असते. 


रामनाथ कोविंद यांनी 25 जुलै, 2017 मध्ये भारताचे राष्ट्रपती बनले. या पूर्वी ते बिहारचे राज्यपालही होते. कोविंद यांच्या सेवेसाठी असलेली कार ही साधीसुधी कार नसून अशाप्रकारची कार अमेरिकेचे अध्यक्षही वापरतात. जगविख्यात मर्सिडीज कंपनीची ही एस क्लास (एस 600) ही कार त्यांच्या दिमतीला भारत सरकारने ठेवलेली आहे. माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जीदेखील याच कारमधून प्रवास करत होते. ही कार जरी मर्सिडीज या कंपनीची असली तरीही ती लांबड्या लिमोझीनी कारसारखी दिसते. मर्सिडीज आणि मेबॅक या कंपन्यांनी मिळून जर्मनीमध्ये ही प्रशस्त आणि दणकट कार बनविली आहे. 


काय आहे खास...
भारताचे राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक आहेत. त्यांची सुरक्षा ही पंतप्रधानांपेक्षाही कडक असते. यामुळे कोणत्याही दौऱ्यावेळी त्यांच्यावर दहशतवादी हल्ला झाल्यास त्यांना काही होऊ नये म्हणून या कारची खास रचना केलेली आहे. एखाद्या हल्लामध्ये राष्ट्रपती जखमी झाल्यास त्यांच्यासाठी ऑक्सिजनची सोय, अंधारात सुखरूप मार्ग काढण्यासाठी मार्गदर्शक यंत्रणा, बॅलिस्टिक प्रोटेक्शन आणि ताज्या हवेची सोय या कारमध्ये करण्यात आली आहे. या शिवाय या कारवर बॉम्ब हल्ला झाल्यास आतील राष्ट्रपतींना धक्काही जाणवणार नाही. तसेच एकही गोळी आत शिरणार नाही याची खास व्यवस्था करण्यात आली आहे. म्हणजेच कारवर जर 0.44 कॅलिबरच्या बंदुकीची गोळी, मिलिटरी रायफल शॉट किंवा एखादे मिसाईल जरी आदळल्यास कारमधील व्यक्ती सुरक्षित राहणार आहे. 


या कारला पंक्चर होण्याचा धोकाही फार कमी आहे. जरी पंक्चर झाली तरीही ही कार काहीशे किमी वेगाने धावू शकते. याशिवाय या कारमध्ये सॅटेलाईट सह जॅमरचीही सुविधा देण्यात आली आहे. यामुळे राष्ट्रपती कोठूनही कुणाशीही बोलू शकतात. 

बॅलिस्टिक प्रोटेक्शन 
हे फिचर या कारला बुलेटप्रूफ बनविते. गॅस बॉम्बचा हल्ला झाल्यास राष्ट्रपतींना स्वच्छ हवा आणि ऑक्सिजनही लगेचच मिळू शकतो. 

 

इंजिनांचा बाप
मर्सिडीज S600 पुलमॅन गार्ड असे या कारचे नाव असून यामध्ये टर्बो V12 हे 530 बीएचपी आणि 830 न्युटन मीटर एवढा प्रचंड टॉर्क देणारे इंजिन बसविण्यात आले आहे. तसेच 4123 मिमीचा व्हीलबेस देण्यात आला आहे. कारमधील बसण्याची जागा आणि इंटेरिअरही अशा पद्धतीने केले आहे की कारबाहेरील विद्रोहींना न कळताच बैठकही घेतली जाऊ शकते. 
 

Web Title: India's President car; not only bullet....missile also not impact on this 12 crore car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.