भारताची ‘राफेल’ इतर देशांहून असतील सरस; चार वर्षांत ३६ विमाने सक्षम होतील
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 12:37 AM2018-11-20T00:37:54+5:302018-11-20T00:40:09+5:30
दसॉल्ट कंपनी इतर देशांना दिली तशीच साधी ३४ राफेल लढाऊ विमाने सुरुवातीस भारतास देईल आणि त्यानंतर विमानांची क्षमता वाढविणारी भारताला हवी असलेली जास्तीची विविध उपकरणे नंतर बसवून दिली जातील.
नवी दिल्ली : दसॉल्ट कंपनी इतर देशांना दिली तशीच साधी ३४ राफेल लढाऊ विमाने सुरुवातीस भारतास देईल आणि त्यानंतर विमानांची क्षमता वाढविणारी भारताला हवी असलेली जास्तीची विविध उपकरणे नंतर बसवून दिली जातील. अनेक देशांच्या हवाई दलांमध्ये राफेल विमाने कार्यरत असली तरी या विमानांना भारत जी उपकरणे बसवून घेणार आहेत तशी अन्य कोणत्याही देशाकडे नाहीत. त्यामुळे भारताची राफेल विमाने इतरांहून कांकणभर सरस ठरतील.
संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले की, तयार मिळणाऱ्या विमानांमध्ये भारताला १३ प्रकारची क्षमतावर्धक उपकरणे बसवून हवी आहेत. ही उपकरणे सर्व विमाने दिल्यानंतर टप्प्याटप्प्याने बसवून दिली जातील.
कंत्राटानुसार शेवटचे ३६ वे विमान भारताकडे सुपूर्द केल्यानंतर ३६ विमानांना खास भारताला हवी असलेली उपकरणे बसविण्याचे काम दसॉल्ट कंपनी भारतातच करेल.
भेदक क्षमता वाढेल
- ही प्रामुख्याने प्रगत रडार क्षमतेची उपकरणे असतील जेणेकरून अधिक लांब पल्ल्याच्या हल्ल्यासाठी ही विमाने उपयोगी होतील.
- वाढीव उपकरणांमुळे या विमानांचे अतिउंचीवरील धावपट्टीवरून उड्डाण करणे व तेथे उतरविणे शक्य होईल.
- लक्ष्याचा अचूक वेध घेणाºया ‘इन्फ्रा रेड सर्च अॅण्ड ट्रॅक सेन्सर’चाही त्यात समावेश असेल.
- अत्यंत प्रभावी ‘इलेक्ट्रॉनिक जॅमर पॉड’ हे आणखी वाढीव बलस्थान असेल.