हवा प्रदूषणामुळे होणा-या मृत्यूंमध्ये भारत दुस-या क्रमांकावर

By admin | Published: February 15, 2017 08:38 AM2017-02-15T08:38:40+5:302017-02-15T08:38:40+5:30

स्टेट ऑफ ग्लोबल एअर 2017 ने यासंबंधी आकडेवारी जाहीर केली असून चीन पहिल्या क्रमांकावर असून त्यानंतर भारताचा क्रमांक आहे

India's second largest number of deaths due to air pollution | हवा प्रदूषणामुळे होणा-या मृत्यूंमध्ये भारत दुस-या क्रमांकावर

हवा प्रदूषणामुळे होणा-या मृत्यूंमध्ये भारत दुस-या क्रमांकावर

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - भारतातील हवा प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. हवा प्रदूषणामुळे होणा-या मृत्यूंमध्ये भारत दुस-या क्रमांकावर आहे. स्टेट ऑफ ग्लोबल एअर 2017 ने यासंबंधी आकडेवारी जाहीर केली असून चीन पहिल्या क्रमांकावर असून त्यानंतर भारताचा क्रमांक आहे. भारतात गतवर्षी प्रदूषणामुळे तब्बल 2 लाख 54 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे फक्त चीन आणि भारतातील मृतांचा आकडा जगभरातल्या आकडेवारीच्या अर्ध्याहून जास्त आहे.
 
वाढत्या प्रदूषणामुळे ओझोन वायू निर्माण होत असून श्वसनेंदियांचे रोग जडत आहेत. गतवर्षी दिवाळीत दिल्ली आणि एनसीआर परिसरात पसरलेली प्रदूषणाची चादर यामुळे ही समस्या किती जठील झाली आहे याची प्रचिती आली होती. ओझोन वायूमुळे होणा-या मृत्यूंचा आकडा भारतात जास्त आहे. भारताचा हा आकडा बांगलादेशच्या 13  तर पाकिस्तानच्या 21 पट जास्त आहे. 
 
जगातील 92 टक्के लोकसंख्या ही अशुद्ध हवेत जगत असल्याचं अहवालात सांगण्यात आलं आहे. 'जगभरात हवा प्रदूषणाची समस्या वाढत चालली आहे. या नव्या अहवालामुळे वेळेआधीच मृत्यू होण्यामध्ये हवा प्रदूषणाचा किती हात आहे हे लक्षात येतं', असं हेल्थ इफेक्ट्स इन्स्टिट्यूटचे संचालक डॅन ग्रीनबॉम यांनी सांगितलं आहे.
 

Web Title: India's second largest number of deaths due to air pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.