भारताने दिलेल्या चोख प्रत्युत्तरात पाच पाकिस्तानी सैनिक ठार
By admin | Published: June 1, 2017 04:33 PM2017-06-01T16:33:46+5:302017-06-01T16:45:28+5:30
जम्मू काश्मीरात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलं आहे
Next
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 1 - जम्मू काश्मीरात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भीमबेर आणि बट्टल सेक्टरमध्ये करण्यात आलेल्या प्रत्युत्तराच्या कारवाईत पाच पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत, तर सहा ते सात सैनिक जखमी झाले आहेत. भारताने केलेल्या कारवाईनंतर भेदरलेल्या पाकिस्तानने भारतीय उच्चायुक्त जे पी सिंह यांच्याशी संपर्क साधला आहे.
राजौरी आणि पुंछ जिल्ह्यात नियंत्रणं रेषेवर असणा-या चौक्यांवर पाकिस्तानने गुरुवारी मोर्टारने हल्ला करत, गोळीबारी करत शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं होतं. हल्ल्यात जनरल इंजिनिअरिंग रिझर्व्ह फोर्सचा एक कर्मचारी मारला गेला, तर दोघेजण जखमी झाले होते. जखमींमध्ये बीएसएफचा एक जवानही सामील होता. यानंतर भारतीय जवानांनी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले.
लष्कराचे प्रवक्ता लेफ्टनंत कर्नल मनीष मेहता यांनी सांगितलं की, "पाकिस्तानी लष्कराने सकाळी साडे सात वाजता राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवरील चौक्यांवर मोर्टारने हल्ला करत गोळीबारदेखील केला". पाकिस्तानी सैनिकांनी सकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवरील कृष्णाघाटी सेक्टरमध्येही गोळाबार केला असल्याचं त्यांनी सांगितलं. नियंत्रण रेषेवर बालनोई आणि मानकोट सेक्टरमध्येही गोळीबार झाल्याचं वृत्त आहे.
Jammu & Kashmir: 5 Pak soldiers killed & six injured in retaliatory fire assaults by Indian Army, in Bhimber & Battal sector- Sources pic.twitter.com/cCCTJj77k4
— ANI (@ANI_news) June 1, 2017
यावर्षी मे महिन्यात पाकिस्तानी सैन्यांनी केलेल्या फायरिंगचा फटका 12 हजार लोकांना बसल्याचं कळत आहे. 17 मे रोजी पाकिस्तानी सैन्यांनी राजौरी जिल्ह्यातील बालाकोट सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवरील चौक्यांवर हल्ला केला होता. 15-16 मे रोजी राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लष्कराने सेनेच्या रहिवासी ठिकाणांवर तोफा डागल्या होत्या. तसंच 13 मे रोजी पाकिस्तानने रहिवासी परिसर आणि मुख्य चौक्यांवर केलेल्या हल्ल्यात दोन सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर तिघे जखमी झाले होते.