उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची प्रकृती खालावली, दिल्लीतील AIIMS मध्ये दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 11:13 IST2025-03-09T11:12:13+5:302025-03-09T11:13:54+5:30
रात्री झोपताना त्यांना अस्वस्थता जाणवली आणि छातीत दुखल्याचे सांगण्यात येत आहे.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची प्रकृती खालावली, दिल्लीतील AIIMS मध्ये दाखल
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची प्रकृती अचानक खालावली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, काल रात्री २ वाजता त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले, येथे त्यांना स्टेंट टाकण्यात आली आहे. रात्री झोपताना त्यांना अस्वस्थता जाणवली आणि छातीत दुखल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांची पकृती सध्या स्थीर आहे.
सध्या डॉक्टरांचा एक चमू त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहे. धनखड यांना एम्सच्या कार्डियोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. राजीव नारंग यांच्या देखरेखीखाली क्रिटिकल केअर युनिटमध्ये (CCU) भर्ती करण्यात आले आहे.
एएनआयने रुग्णालयातील सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, 73 वर्षीय उपराष्ट्रपती जगदिप धनखड यांना रविवारी (9 मार्च, 2025) पहाटेच्या सुमारास एम्सच्या कार्डियक विभागात भर्ती करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थीर असून डॉक्टर त्यांच्यावर लक्ष ठेऊन आहेत.
उपराष्ट्रपति जगदीप धनखड़ को सुबह-सुबह AIIMS दिल्ली के कार्डियक विभाग में भर्ती कराया गया। उनकी हालत स्थिर है और उन्हें निगरानी में रखा गया है: AIIMS अस्पताल सूत्र
— ANI_HindiNews (@AHindinews) March 9, 2025
धनखड यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी जेपी नड्डा एम्समध्ये -
केंद्रीय आरोग्य मंत्री तथा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे देखील उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी एम्समध्ये पोहोचले. तसेच, धनखड यांच्या उपचारासाठी मेडिकल बोर्ड देखील तयार करण्यात आले आहे. यात वेगवेगळ्या स्पेशलिस्ट डॉक्टर्सचा समावेश आहे.