"भारताचे कमकुवत पंतप्रधान", राहुल गांधींची मोदींवर टीका

By admin | Published: July 5, 2017 03:17 PM2017-07-05T15:17:33+5:302017-07-05T15:21:04+5:30

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींचा दुबळे पंतप्रधान म्हणून उल्लेख केला आहे

"India's Weak Prime Minister", Rahul Gandhi's Commentary on Modi | "भारताचे कमकुवत पंतप्रधान", राहुल गांधींची मोदींवर टीका

"भारताचे कमकुवत पंतप्रधान", राहुल गांधींची मोदींवर टीका

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींचा दुबळे पंतप्रधान म्हणून उल्लेख केला आहे.  एच-1बी व्हिसा मुद्दा उपस्थित न केल्याबद्दल आणि अमेरिकेने ‘भारत प्रशासित काश्मीर’ असा उल्लेख केला असताना त्याचा विरोध न केल्याबद्दल राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना दुबळे पंतप्रधान संबोधले आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून हे वक्तव्य केलं आहे. 
 
आणखी वाचा - 
कसा मिळवायचा अमेरिकेचा व्हिसा?
भारतीय आयटी उद्योग एच-१ बी व्हिसावर अवलंबून नाही
आता हाफिज सईद पाकिस्तानसाठीही दहशतवादी
 
राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटरवर दोन फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये दोन वेगवेगळ्या बातम्यांचा उल्लेख आहे. एक बातमी आहे ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात एच-1बी व्हिसासंबंधी कोणतीच बातचीत झाली नाही. तर दुस-या बातमीत अमेरिकेकडून ‘भारत प्रशासित काश्मीर’ असा उल्लेख केला असतानाही परराष्ट्र मंत्रालयाने ते मान्य केलं असल्याचा उल्लेख आहे. या दोन्ही बातम्यांसोबत राहुल गांधी यांनी कॅप्शन दिलं आहे की, "भारताकडे दुबळे पंतप्रधान आहेत". काँग्रेस या दोन्ही मुद्द्यांवरुन गेल्या आठवड्यापासून आक्रमक आहेत. राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर दोन्ही पक्षांमधील संघर्ष अजून वाढण्याची शक्यता आहे. 
 
26 जून रोजी हिजबुल मुजाहिद्दिनचा म्होरक्या, दहशतवादी सईद सल्लाउद्दिनला ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’ घोषित करताना अमेरिकेने काढलेल्या आदेशात ‘भारत प्रशासित काश्मीर’ असा धक्कादायक उल्लेख करण्यात आला होता. यानंतर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला होता. या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी आणि त्यांचे सहकारी शांत का बसलेत ? असा सवालही काँग्रसने उपस्थित केला होता. 
 
एच-१बी व्हिसात झाली ३७ टक्के घट -
२0१६ या वर्षात भारतातील सात मोठ्या कंपन्यांच्या एच-१बी व्हिसात ३७ टक्के घट झाली आहे. या वर्षात या कंपन्यांचे ९,३५६ नवे व्हिसा अर्ज मंजूर करण्यात आले. २0१५ च्या तुलनेत त्यांना ५,४३६ व्हिसा कमी मिळाले.
 
वॉशिंगटन स्थित नॅशनल फाउंडेशन फॉर अमेरिकन पॉलिसी या संस्थेने जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली. सात भारतीय कंपन्यांना मंजूर झालेल्या व्हिसाचे प्रमाण अमेरिकेच्या एकूण कामकरी मनुष्यबळाच्या तुलनेत 0.00६ टक्के इतके अल्प आहे.
 
फाउंडेशनने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे (टीसीएस) व्हिसाचे प्रमाण ५६ टक्क्यांनी घटले आहे. टीसीएसला २0१५ मध्ये ४,६७४ व्हिसा मिळाले होते, २0१६ मध्ये मात्र फक्त २,0४0 व्हिसा मिळाले. याचाच अर्थ कंपनीला २,६३४ व्हिसा कमी मिळाले.
 
विप्रोला ५२ टक्के म्हणजे १,६0५ व्हिसा कमी मिळाले. २0१५ मध्ये विप्रोच्या व्हिसाची संख्या ३,0७९ असताना २0१६ मध्ये ती १,४७४ झाली. इन्फोसिसला १६ टक्के म्हणजेच ४५४ व्हिसा कमी मिळाले. इन्फोसिसच्या व्हिसाची संख्या २,८३0 वरून २,३७६ वर आली.
 

Web Title: "India's Weak Prime Minister", Rahul Gandhi's Commentary on Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.