"भारताची शस्त्रास्त्रे अंडी उबविण्यासाठी नाहीत, चीनला त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावे"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 03:52 AM2020-06-26T03:52:06+5:302020-06-26T03:52:55+5:30

अशा धमक्यांना बळी न पडता भारताने सर्व ताकदीनिशी चीनला सीमेवरून मागे रेटायला हवे.

India's weapons are not for hatching eggs, China should answer in their own language | "भारताची शस्त्रास्त्रे अंडी उबविण्यासाठी नाहीत, चीनला त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावे"

"भारताची शस्त्रास्त्रे अंडी उबविण्यासाठी नाहीत, चीनला त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावे"

Next

नवी दिल्ली : सीमेवर मोठा फौजफाटा गोळा करून चीन आपल्यावर डोळे वटारत असताना मोदी सरकार मात्र मवाळपणे चर्चेचे गु-हाळ घालून बसले आहे, अशी टीका करीत काँग्रेसने चीनला त्यांच्याच भाषेत सडेतोड उत्तर द्यावे, अशी मागणी केली आहे. सीमेवरील परिस्थितीवरून अनेक काँग्रेस नेत्यांनी टष्ट्वीटरवरून केंद्र सरकारवर तोफ डागली. भारताचे शस्त्रभांडार हे काही अंडी उबविण्यासाठी नाही, असा टोला लगावत पक्षाचे लोकसभेतील गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी लिहिले आहे की, चीन आपल्याला धमकावू पाहत आहे; पण अशा धमक्यांना बळी न पडता भारताने सर्व ताकदीनिशी चीनला सीमेवरून मागे रेटायला हवे.
चौधरी यांनी म्हटले आहे की, सरकार हा वाद राजनैतिक मुत्सद्देगिरीने मिटवू पाहत आहे. त्याला काहीच हरकत नाही; पण दिवसेंदिवस परिस्थिती आणखी वाईट होत आहे, हेही विसरून चालणार नाही. चीन मोठ्या नेटाने व चलाखीने पावले टाकत आपला प्रदेश बळकावत आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांनी टष्ट्वीटरवर लिहिले की, पंतप्रधान काहीही म्हणत असले तरी गलवान खोऱ्यातील ‘जैसे थे’ स्थिती चीनने बदलली आहे, हे न नाकारता येणारे वास्तव आहे. चीनला एप्रिलपूर्वीच्या रेषेपर्यंत मागे जायला आपले सरकार कसे भाग पाडते, याकडे देशाची जनता अपेक्षेने पाहत आहे.
>संसदेचे व्हर्च्युअल अधिवेशन घ्या
सीमेवरील स्थितीसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करून निर्णय घेण्याची गरज आहे. अशी चर्चा फक्त संसदेतच होऊ सकते. त्यामुळे सरकारने संसदेचे व्हर्च्युअल अधिवेशन बोलवावे, अशी मागणी पक्षाचे प्रवक्ते पवन खेरा यांनी पत्रकार परिषदेत केली.

Web Title: India's weapons are not for hatching eggs, China should answer in their own language

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.