जगाला खुणावू लागला भारताचा ‘युवा’ ग्राहक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 08:09 AM2023-11-25T08:09:22+5:302023-11-25T08:09:58+5:30

जगप्रसिद्ध गुतवणूकदारांकडून कौतुक

India's 'young' consumer began to mark the world | जगाला खुणावू लागला भारताचा ‘युवा’ ग्राहक

जगाला खुणावू लागला भारताचा ‘युवा’ ग्राहक

नवी दिल्ली : भारत जगभरातील बड्या कंपन्यांचे आकर्षणाचे प्रमुख केंद्र बनला असून या कंपन्या सातत्याने आणि मोठ्या संख्येने भारताकडे धाव घेताना दिसत आहेत. जगप्रसिद्ध गुंतवणूकदार मार्क मोबियस यांनी आता यामागचे कारण स्पष्ट केले आहे. देशातील युवा लोकसंख्या हे याचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे विक्रीत मोठा बदल पाहायला मिळू शकतो. त्यामुळे कंपन्या भारताकडे धाव घेत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

मोबियस कॅपिटल पार्टनर्सचे संस्थापक असलेल्या मार्क मोबियस यांनी एका मुलाखतीत सांगितले की, जगभरातील कंपन्या भारतास आगामी काळातील मोठा बाजार मानत आहेत.

जागरूकता गरजेची
मोबियस यांनी म्हटले की, भारतीय लोक गुंतवणुकीच्या बाबतीत जागरूक होत आहेत. भारतीयांच्या वाढत्या जागरूकतेचा बाजारास लाभ मिळेल. शेअर बाजारासह संपूर्ण वित्तीय बाजारात चांगली वृद्धी पाहायला मिळेल. त्यातच भारतीयांच्या उत्पन्नातही वाढ होत आहे. त्यामुळे आगामी काळात गुंतवणुकीत मोठी वाढ होऊ शकते. अमेरिकेत आधी हाच कल पाहायला मिळाला होता.

Web Title: India's 'young' consumer began to mark the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.