स्वदेशी कोरोना लस मिळू शकते मार्चपर्यंत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2020 12:57 AM2020-10-02T00:57:13+5:302020-10-02T00:57:53+5:30

corona news: डॉ. राय यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, कोवाक्सिन लसीच्या दुसºया टप्प्यातील चाचणी सुरु आहे

Indigenous corona vaccine can be obtained till March | स्वदेशी कोरोना लस मिळू शकते मार्चपर्यंत

स्वदेशी कोरोना लस मिळू शकते मार्चपर्यंत

Next

एस. के. गुप्ता ।

नवी दिल्ली : कोरोनाच्या स्वदेशी निर्मित दोन लसींच्या चाचण्या झाल्या आहेत. तिसऱ्या टप्प्यातील चाचणी लवकरच सुरु होणार आहे. सरकारने या लसीच्या मानवी चाचणीची जबाबदारी एम्सचे मुख्य संशोधक डॉ. संजय राय यांना सोपविली आहे. सर्व चाचण्या चांगल्या राहिल्या आणि फास्ट ट्रॅक प्रक्रिया राबविली तरी लोकांपर्यंत लस पोहचविण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागेल. म्हणजेच, लस मार्चपर्यंत मिळू शकेल.

डॉ. राय यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, कोवाक्सिन लसीच्या दुसºया टप्प्यातील चाचणी सुरु आहे. सप्टेंबरमध्ये पहिल्या टप्प्यातील चाचणी पूर्ण झाली आहे. कोणत्याही लसीला तीन टप्प्यात चाचणी पूर्ण करण्यासाठी किमान सहा महिने लागतात. जर लसीच्या चाचणीतून दिसून आले की, लस अँटीबॉडी बनवित नाही. तर, सर्वकाही शून्य होईल. असे अनेकदा झालेले आहे.
डॉ. राय म्हणाले की, पहिल्या टप्प्यात मानवी चाचणीत हे दिसून आले की, ही लस सुरक्षित आहे. दुसºया टप्प्यात हे बघितले जाईल
की, ही लस अँटीबॉडी बनविते की नाही?

Web Title: Indigenous corona vaccine can be obtained till March

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.