संस्कृतीने दिलेली स्वतंत्र ओळख म्हणजेच देशीवाद (२)

By admin | Published: September 1, 2015 09:38 PM2015-09-01T21:38:12+5:302015-09-01T21:38:12+5:30

स्मरणसंचित संपणे हीच भाषा मृत होण्याची लक्षणे : गणेश देवी

Indigenous freedom (2) | संस्कृतीने दिलेली स्वतंत्र ओळख म्हणजेच देशीवाद (२)

संस्कृतीने दिलेली स्वतंत्र ओळख म्हणजेच देशीवाद (२)

Next
मरणसंचित संपणे हीच भाषा मृत होण्याची लक्षणे : गणेश देवी
१९ व्या शतकात उदारीकरणाच्या सपाट्यात परंपरा वाईट आणि जुनाट असल्याचे वारे वाहिले. आधुनिकता म्हणजे चंगळवाद, उपभोग असा विचार लादला गेला आणि लोकांचे विचार व आवडीनिवडी बदलण्याचाच प्रयत्न झाला. यात दिग्भ्रमितता वाढली. जगातील सहा हजार भाषांपैकी चार हजार भाषा सध्या संपण्याच्या मार्गावर आहेत कारण त्या भाषांमध्ये भूतकाळ दर्शविणाऱ्या वाक्यांची विविधता नष्ट होते आहे. भाषेतून भूतकाळ समर्थपणे सांगता येत नाही आणि स्मरणसंचित सांभाळण्यात भाषा अपयशी ठरते तेव्हा ती मृतप्राय होते. भाषिक व्यवहार ठप्प पडले की त्या भाषेत जगणे कठीण होते आणि लोक जगण्यासाठी इतर भाषा आत्मसात करतात. त्यामुळेच भाषेला भूतकाळ सांभाळता आला पाहिजे, असे गणेशदेवी म्हणाले. परकीय आक्रमणानंतर वसाहतवादातून आलेले साहित्य असा समज झाला आणि दुसरीकडे राष्ट्र या संकल्पनेची निर्मिती या दोन जखमा झाल्या. राष्ट्र म्हणजे एक भाषा, एक धर्म, एक संस्कृती ही कल्पना युरोपात आली. त्याप्रमाणेच भारतातही एक भाषा लादण्याचा प्रयत्न झाला पण अखेर १४ भारतीय भाषांना राष्ट्रीय भाषा म्हणून जाहीर करावे लागले. वसाहतवादाचे साहित्य आणि राष्ट्र संकल्पनेच्या या दोन जखमातून बाहेर पडल्याशिवाय आपण सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध होऊ शकणार नाही. हा शोध सुरूच राहील, असे ते म्हणाले. रंगनाथ पठारे यांनी बीजभाषणातून देशीवाद आणि काही आव्हानांचा उहापोह करताना संपूर्ण चर्चेचे आयाम काय असू शकतात, याचे सूतोवाच केले. देशीवाद आधुनिकीकरणाला विरोध करणारा नाही पण देशी स्वरूप आत्मसात करणारा असावा, असे ते म्हणाले. प्रास्ताविक अक्षयकुमार काळे, स्वागतभाषण कृष्णा किंबहुने आणि संचालन कोमल ठाकरे यांनी केले. आभार शैलेंद्र लेंडे यांनी मानले. चर्चासत्रापूर्वी ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांनी भालचंद्र नेमाडे यांचा सत्कार केला. याप्रसंगी गिरीश गांधी, प्रमोद मुनघाटे, श्याम धोंड प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: Indigenous freedom (2)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.