इंडिगोचा सर्व्हर डाऊन; सर्व विमानतळांवर प्रवासी रखडले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2018 04:42 PM2018-10-07T16:42:12+5:302018-10-07T16:54:57+5:30
दिल्ली विमानतळासह देशभरातील इंडिगोची विमाने ठप्प झाली आहेत.
नवी दिल्ली : सर्वात स्वस्त विमान प्रवास घडवणारी विमान कंपनी म्हणून नावारुपास आलेल्या गो इंडिगोचा सर्व्हर गेल्या काही तासांपासून बंद पडल्याने दिल्ली विमानतळासह देशभरातील इंडिगोची विमाने ठप्प झाली आहेत. यामुळे प्रवाशांना विमानतळावरच ताटकळत राहावे लागले आहे.
IndiGo systems are down at Delhi's IGI airport due to a technical error. Passengers of the airline are currently stranded at the Airport. More details awaited.
— ANI (@ANI) October 7, 2018
गो इंडिगो या विमान वाहतूक कंपनीने ट्विट करून यासंबंधीची माहिती दिली आहे. तसेच काही काळासाठी विमान सेवा बंद राहणार असल्याचेही म्हटले आहे. प्रवाशांना ट्विटर, फेसबुक आणि वेबसाईटवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
IndiGo tweets an advisory over its system which is down at all the airports for a while. The airline has asked its passengers to contact it through Twitter, Facebook, its website or its contact number. pic.twitter.com/hNt9UA3OAE
— ANI (@ANI) October 7, 2018