विमानातली 'विन्डो सीट'ही झाली महाग, वेब चेक-इनसाठी मोजावे लागणार पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 01:17 PM2018-11-26T13:17:15+5:302018-11-26T13:30:48+5:30

इंडिगो कंपनीने रविवारपासून वेब चेक-इनसाठी चार्ज लावायला सुरुवात केली आहे.

IndiGo, SpiceJet passengers will have to pay extra for web check-in services | विमानातली 'विन्डो सीट'ही झाली महाग, वेब चेक-इनसाठी मोजावे लागणार पैसे

विमानातली 'विन्डो सीट'ही झाली महाग, वेब चेक-इनसाठी मोजावे लागणार पैसे

Next
ठळक मुद्देवेब चेक-इनसाठी मोजावे लागणार पैसेइंडिगो कंपनीने वेब चेक-इनसाठी चार्ज सुरुवेब चेक-इन चार्जवर प्रवाशांमध्ये नाराजी

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठ्या विमान कंपन्या असलेल्या इंडिगो आणि जेट एअरवेज यांनी महसूल उत्पन्न वाढविण्यासाठी आणि कॉस्ट घटविण्यासाठी आपल्या धोरणात बदल केला आहे. इंडिगो कंपनीने रविवारपासून वेब चेक-इनसाठी चार्ज लावायला सुरुवात केली आहे. म्हणजे, ज्यावेळी तुम्ही चेक-इनसाठी विमानतळावर लांब रांगेत उभारणे टाळण्यासाठी वेब चेक-इन करता. त्यावेळी तुम्हाला यासाठी ज्यादा पैसे मोजावे लागणार आहेत.

एका प्रवाशाच्या ट्विटला उत्तर देताना इंडिगोने सांगितले की, प्रवाशांना आपले वेब चेक-इन पूर्ण करण्यासाठी एका सीटसाठी पैसे भरावे लागतील. आमच्या पॉलिसीनुसार, वेब चेक-इनसाठी सर्व सीटांसाठी चार्ज आकारले जाणार आहेत. याला पर्याय म्हणून तुम्ही विमानतळार मोफत चेक-इन करु शकता. तसेच, विमानातील सीट्स जशा उपलब्ध असतील तशा दिल्या जातील, असे इंडिगोने म्हटले आहे.  देशातंर्गत विमान सेवेसाठी इंडिगो मार्केटमध्ये किंग आहे. मार्केटमध्ये 43 टक्के भाग इंडिगोकडे आहे.


एका प्रवाशासाठी सीट निवडण्यासाठी किंमत 200 ते 1,000 रुपये इतकी आहे. पहिल्या रांगेतील सीट्स आणि इमर्जन्सी सीट्ससोबत जास्त लेग स्पेस असल्या कारणामुळे त्यांच्या इतर सीट्सपेक्षा जास्त चार्ज आकारला जातो. वेब चेक-इन चार्ज असण्याचे कारण म्हणजे, जेव्हा तुम्ही एकटे किंवा ग्रुपमधून प्रवास करत असाल, तर तुम्ही वेगवेगळ्या सीट्स निवडा किंवा फ्री मिडल रोची निवड करा. मात्र, तुम्ही वेब चेक-इन केले, तर यासाठी ज्यादा पैसे भरावे लागणार आहेत. 


इंडिगोमध्ये जर तुम्ही 12 आणि 13 व्या रांगेतील सीट निवडणार असाल तर तुम्हाला 600 रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच, दुसऱ्या रांगेपासून दहाव्या रांगेपर्यंतच्या सीट्ससाठी 300 रुपये लागणार आहेत. अकरावी किंवा 14 ते 20 व्या रांगेतील सीट्स पाहिजे असेल तर 200 रुपये मोजावे लागणार आहेत. दरम्यान, या सीट्स निवडीवर चार्ज लावल्यामुळे प्रवाशांनी ट्विटरवर नाराजी व्यक्त केली आहे.  



 

Web Title: IndiGo, SpiceJet passengers will have to pay extra for web check-in services

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.