इंदिराजींची देशव्यापी जन्मशताब्दी

By admin | Published: June 24, 2016 12:19 AM2016-06-24T00:19:37+5:302016-06-24T00:19:37+5:30

काँग्रेसने दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी समारंभाला देशव्यापी स्वरूप देण्याचा निर्णय घेतला आहे.

Indiraji's nationwide birth centenary | इंदिराजींची देशव्यापी जन्मशताब्दी

इंदिराजींची देशव्यापी जन्मशताब्दी

Next

शीलेश शर्मा,  नवी दिल्ली
मोदी सरकारच्या नेहरू-गांधींचा वारसा बाजूला सारण्याच्या प्रयत्नांना प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसने दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी समारंभाला देशव्यापी स्वरूप देण्याचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यासाठी दोन समित्यांची घोषणा केली असून, पहिल्या समितीत स्वत: सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी , मनमोहन सिंग, ए. के. अ‍ॅन्टनी, करणसिंग, माधवसिंग सोळंकी, शिवराज पाटील, सुशीलकुमार शिंदे आदी २१ ज्येष्ठ नेते आहेत.
आयोजनाची अंमलबजावणी करणाऱ्या दुसऱ्या समितीत शीला दीक्षित, मुकुल वासनिक मोतीलाल व्होरा, जनार्दन द्विवेदी, अजय माकन, डी. के. शिवकुमार, आशाकुमारी, मिलिंद देवरा, प्रिया दत्त आणि इमरान किदवई यांना स्थान देण्यात आले आहे.

Web Title: Indiraji's nationwide birth centenary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.