व्यक्तीगत अहंकार आडवा येतो, लालूंचा नितीशकुमारांना टोला
By admin | Published: December 28, 2016 02:03 PM2016-12-28T14:03:07+5:302016-12-28T14:04:51+5:30
बिहारमध्ये भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकेकाळी परस्परांचे कट्टर विरोधक असलेल्या नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांनी हातमिळवणी केली.
Next
ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. 28 - बिहारमध्ये भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकेकाळी परस्परांचे कट्टर विरोधक असलेल्या नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांनी हातमिळवणी केली. आज इथे नितीश-लालू जोडीची सत्ता असली तरी दोघांमधील मतभेदही वाढत चालले आहेत.
नोटाबंदीच्या मुद्यावर एकाबाजूला नितीश कुमार मोदी सरकारला साथ देत आहेत तर दुस-या बाजूला लालूंची टीका सुरु आहे. नोटाबंदीच्या विषयावर नितीश यांनी भाजपा विरोधी आघाडीत सहभागी होण्यास नकार दिला. यावर लालूंनी नितीश कुमारांचे नाव न घेता विरोधकांच्या एकजुटीमध्ये व्यक्तीगत अहंकार आडवा येत असल्याची टीका केली.
नोटाबंदीमुळे लोकांना जो त्रास सहन करावा लागतोय त्यावर सर्व विरोधकांची एकजूट आहे. पण व्यक्तीगत अहंकारामुळे अनेक जण एका व्यासपीठावर येत नाहीत असा नाव न घेता नितीश कुमारांना लालूंनी टोला लगावला.