भारत-कॅनडा तणाव; केवळ हत्येची माहिती हा सज्जड पुरावा नव्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 06:39 AM2023-09-25T06:39:48+5:302023-09-25T06:41:08+5:30
अमेरिकेकडे दुर्लक्ष करत वातावरण शांत करण्याचे प्रयत्न
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी कॅनडातील खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येमध्ये भारतीय एजंटचा हात असल्याचा आक्षेपार्ह आरोप केला होता. याला कारणीभूत ठरलेल्या दस्तावेजाची पुष्टी करणाऱ्या अमेरिकेच्या वरिष्ठ मुत्सद्द्याकडे दुर्लक्ष करून वातावरण शांत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.कॅनडाच्या पंतप्रधानांकडे इलेक्ट्रॉनिक गुप्तचरांची माहिती असली तरी केवळ तेवढीच पुरावा म्हणून ग्राह्य धरू शकली जात नाही.
फाइव्ह आय क्लबमध्ये कॅनडाचा भागीदार असलेल्या अमेरिकेने हरदीप सिंह निज्जर याच्या कॅनडातील हत्येची इलेक्ट्रॉनिक गुप्तचर माहिती मिळवण्यासाठी मदत केली असण्याची शक्यता आहे. अमेरिकेने अशा प्रकारचे सहकार्य करण्याबाबत सांगितले होते, ते कॅनडाप्रमाणे भारताने नाकारलेले नाही. जस्टिन ट्रुडो यांच्या रेटिंगमध्ये घसरण झाल्याचा संदर्भ देत ते म्हणाले की, त्यांच्या पदावर नवीन नेतृत्व आल्यावरही अमेरिका संबंध पूर्ववत करू शकते. भारतही अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या २०२४च्या निकालाची प्रतीक्षा करेल.
भारताशी लढा म्हणजे...
अमेरिकेला भारत आणि कॅनडामधून कोणाला निवडायचे असेल तर तो भारत आहे, असे वक्तव्य पेंटागॉनचे माजी अधिकारी मायकेल रूबीन यांनी केले होते. सामरिकदृष्ट्या भारत कॅनडाच्या तुलनेत खूपच महत्त्वाचा आहे आणि ओटावाने भारताशी लढा देणे म्हणजे मुंगीने हत्तीशी लढा देण्यासारखे आहे, असेही ते म्हणाले.
भारताशी पंगा कॅनडाच्या अंगलट
nमहिंद्रांनंतर जेएसडब्ल्यू स्टीलने धक्का देत कॅनडातील व्यवसाय गुंडाळण्याची तयारी सुरू केली.
nदोघांतील स्टेकबाबतची चर्चा मंदावली आहे. भारत कॅनडाचा नववा सर्वात मोठा व्यावसायिक भागीदार आहे.
घोषित केलेले फरार दहशतवादी
परमजीत सिंग पम्मा- ब्रिटन, वाधवा सिंग बब्बर- पाकिस्तान, कुलवंत सिंग मुथरा- ब्रिटन, जेएस धालीवाल- अमेरिका, सुखपाल सिंग- ब्रिटन,हरप्रीत सिंग उर्फ राणा सिंग- अमेरिका, सरबजीत सिंग बेन्नूर- ब्रिटन, कुलवंत सिंग उर्फ कांता- ब्रिटन, हरजाप सिंग उर्फ जप्पी सिंग- अमेरिका, रणजित सिंग नीता- पाकिस्तान, गुरमीत सिंग उर्फ बग्गा बाबा- कॅनडा, गुरप्रीत सिंग उर्फ बागी- ब्रिटन, जस्मीत सिंग हकीमजादा- दुबई, गुरजंत सिंग ढिल्लन- ऑस्ट्रेलिया, लखबीर सिंग रोडे- कॅनडा, अमरदीप सिंग पूरवाल- अमेरिका, जतिंदर सिंग ग्रेवाल- कॅनडा, दुपिंदर जीत- ब्रिटन, एस. हिम्मत सिंग- अमेरिका