लडाखमधील संघर्ष... सीमेवरील तणावावर भारत-चीनमध्ये चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 04:50 AM2020-06-07T04:50:38+5:302020-06-07T04:50:49+5:30
लडाखमधील संघर्ष। लेफ्ट. जनरल हुद्याच्या अधिकाऱ्यांची बैठक; संवादातून तोडगा काढणार
नवी दिल्ली : गेल्या महिनाभरात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हाणामारी व तणातणीच्या अनेक घटनांमुळे पूर्व लडाख सीमेवर निर्माण झालेल्या तणावावर भारत व चीनच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. या चर्चेतून नेमके काय निष्पन्न झाले हे दोन्हीपैकी कोणत्याही बाजूने लगेच स्पष्ट केलेनाही.
तणाव निर्माण झाल्यापासून दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये झालेली ही सर्वात वरिष्ठ पातळीवरील बैठक होती. या चर्चेत भारतीय बाजूचे नेतृत्व भारतीय लष्कराच्या लेह येथील १४ कॉर्पस्््चे प्रमुख लेफ्ट. जनरल हरिंदर सिंग यांनी तर चीनकडून त्यांच्या तिबेट लष्करी क्षेत्राच्या कमांडरांनी नेतृत्त्व केले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पलिकडे चीनच्या हद्दीत चुशुल-मालदो या ठिकाणी ही बैठक झाली. सीमेवरील उभय देशांच्या लष्करी अधिकाºयांच्या भेटीचे हे नेहमीचे ठरलेले ठिकाण आहे. त्याआधी भारतीय सूत्रांनी असे स्पष्ट केले होते की, पूर्व लडाख सीमेवरील गलवान खोरे, पॅनगाँग त्सो सरोवर व गोगरा या पट्ट्यात सध्याच्या तणावापूर्वीची परिस्थिती कायम ठेवावी, चीनने तेथे सैन्याची मोठी जमवाजमव थांबवावी व भारताला त्यांच्या हद्दीत विकासाची कामे करण्यात अडथळे आणले जाऊ नयेत, या मुद्यांवर भारत चर्चेत ठाम भूमिका घेईल. प्रत्यक्ष सीमेवरही चीनच्या आक्रमकतेने दबून न जाता तोडीस तोड पवित्रा घेण्याचे भारतीय लष्कराने ठरविले होते.
च्भारतीय लष्कराच्या प्रवक्त्याने आाजच्या या चर्चेचा खास उल्लेख न करता फक्त एवढेच सांगितले की, सीमेवरील सध्याच्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी भारत व चीन लष्करी व राजनैतिक पातळीवर चर्चेचे सुप्रस्थापित मार्ग अनुसरत आहेत.
प्रवक्ते काय म्हणाले?
च्शुक्रवारी याच संदर्भात दोन्ही देशांच्या राजनैतिक मुत्सद्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर शनिवारची ही वरिष्ठ पातळीवरील लष्करी बैठक
झाली.
च्परस्परांच्या चिंता व संवेदनशीलतेचा आदर करत शांततापूर्ण चर्चेतून मतभेद दूर करण्याचे शुक्रवारच्या बैठकीत दोन्ही देशांनी मान्य केले होते.
जमवाजमव थांबवावी
या चर्चेत भारतीय बाजूचे नेतृत्व भारतीय लष्कराच्या लेह येथील १४ कॉर्पस्््चे प्रमुख लेफ्ट. जनरल हरिंदर सिंग यांनी तर चीनकडून त्यांच्या तिबेट लष्करी क्षेत्राच्या कमांडरांनी नेतृत्त्व केले. पूर्व लडाख सीमेवरील गलवान खोरे, पॅनगाँग त्सो सरोवर व गोगरा या पट्ट्यात चीनने सैन्याची मोठी जमवाजमव थांबवावी, असे भारताचे मत आहे.