भारत-पाक छुपे युद्ध अफगाणीस्तानातही
By Admin | Published: November 18, 2014 11:29 PM2014-11-18T23:29:28+5:302014-11-18T23:29:28+5:30
अफगाणिस्तानातून नाटो फौजा बाहेर पडल्या, की पाकिस्तान तिथे भारताविरोधात छुपे युद्ध (प्रॉक्सी वॉर) सुरू करेल, असे पाकिस्तानचे माजी लष्करशहा व हुकूमशहा परवेझ मुशर्रफ यांनी म्हटले आहे.
कराची : अफगाणिस्तानातून नाटो फौजा बाहेर पडल्या, की पाकिस्तान तिथे भारताविरोधात छुपे युद्ध (प्रॉक्सी वॉर) सुरू करेल, असे पाकिस्तानचे माजी लष्करशहा व हुकूमशहा परवेझ मुशर्रफ यांनी म्हटले आहे.
मुशर्रफ हे पाकिस्तानचे अध्यक्ष असताना दहशतवादविरोधी युद्धात अमेरिकेचे साथीदार होते; पण सध्या ते कराचीतील आपल्या घरी कडेकोट बंदोबस्तात राहत आहेत. तालिबानच्या धमक्या व मुशर्रफ यांच्या विरोधात लावलेले अनेक खटले, यामुळे ते त्रस्त आहेत. (वृत्तसंस्था)