२४ डिसेंबर ते ५ जानेवारी दरम्यान भारत-पाक मालिका - पीसीबी
By admin | Published: December 9, 2015 03:08 PM2015-12-09T15:08:44+5:302015-12-09T15:08:44+5:30
भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिकेला हिरवा कंदिल दाखवला तर, २४ डिसेंबर ते ५ जानेवारी दरम्यान दोन्ही देशांमध्ये क्रिकेट मालिका आयोजित केली जाईल.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ९ - भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिकेला हिरवा कंदिल दाखवला तर, २४ डिसेंबर ते ५ जानेवारी दरम्यान दोन्ही देशांमध्ये क्रिकेट मालिका आयोजित केली जाईल अशी माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डामधील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. या दौ-यासंबंधी या आठवडयात निर्णय होऊ शकतो.
त्रयस्थ ठिकाणी म्हणजे श्रीलंकेत ही मालिका खेळवण्यात येईल. या दौ-याचा आकार लहान असेल. तीन एकदिवसीय आणि दोन ट्वेंटी-ट्वेंटी सामने खेळवण्यात येतील अशी माहिती पीसीबीमधील सूत्रांनी दिली आहे. पाकिस्तान विरुध्दच्या मालिकेपूर्वी बीसीसीआयला आपल्या खेळाडूंना १० ते १२ दिवसांची विश्रांती द्यायची आहे.
भारतीय संघ सहा किंवा सात जानेवारीला ऑस्ट्रेलिया दौ-यावर निघणार आहे तर, पाकिस्तानचा संघ मर्यादीत षटकांच्या मालिकेसाठी सात जानेवारीला न्यूझीलंडला रवाना होणार आहे. श्रीलंकेत मालिका झाली तर, दोन्ही संघ थेट कोलंबोहून ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडसाठी रवाना होतील.