भारत-अमेरिकेची युती हाच ठरणार दहशतवादाचा कर्दनकाळ
By Admin | Published: February 22, 2017 01:43 PM2017-02-22T13:43:02+5:302017-02-22T13:43:02+5:30
भारत आणि अमेरिकेच्या मैत्रीपूर्ण संबंधामुळे आधीच चीनला धास्ती लागून राहिली आहे.
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 22- भारत आणि अमेरिकेच्या मैत्रीपूर्ण संबंधामुळे आधीच चीनला धास्ती लागून राहिली आहे. त्यातच अमेरिका आणि भारताच्या मैत्रीतील संबंध दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहेत. तसेच भारत आणि अमेरिकेची युती हाच दहशतवाद्यांचा कर्दनकाळ ठरणार आहे, असं वक्तव्य अमेरिका-भारताच्या समर्थकांनी केलं आहे.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोघेही दहशतवाद्यांचे सर्वात वाईट शत्रू आहेत. ट्रम्प आणि मोदींचं नातं कुटुंबातल्या भावांसारखं आहे. दोन्ही देशांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून नोक-यांचं प्रमाण वाढवून आर्थिक प्रगती साधली पाहिजे, या विषयावर एकमत आहे, असं वक्तव्य हिंदू रिपब्लिकन युतीचे संस्थापक शलभ कुमार यांनी केलं आहे.
ते म्हणाले, भारत आणि अमेरिकेचं इस्लामिक दहशतवादावर एकमत असून, मैत्रीपूर्ण संबंधांमुळे हे दोन्ही देश दहशतवादाविरोधात एकत्रित लढत आहेत. मोदी आणि ट्रम्प हे असे देशभक्त आहेत, ज्यांना दोन्ही देशांना दहशतवादापासून मुक्त करायचं आहे. तसेच व्यावसायिकदृष्ट्या त्यांचे विचारही फार जुळत असून, त्यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे दोन्ही देश एकमेकांच्या विचारांशी सुसंगत असून, येत्या काळात त्याचा दोन्ही देशांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.