भारत - अमेरिकेमधील अणु करार मार्गी लागण्याचे संकेत
By admin | Published: January 25, 2015 06:04 PM2015-01-25T18:04:00+5:302015-01-25T18:05:10+5:30
भारतासोबतच्या नागरी अणु करारात अडथळे आणणा-या दोन महत्त्वाच्या मुद्यांवर आज दोन्ही देशांची सहभाती झाली असे सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अणु करार मार्गी लागण्याचे संकेत दिले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २५ - भारतासोबतच्या नागरी अणु करारात अडथळे आणणा-या दोन महत्त्वाच्या मुद्यांवर आज दोन्ही देशांची सहभाती झाली असे सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अणु करार मार्गी लागण्याचे संकेत दिले आहे. भारताला संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व मिळावे यासाठी आम्ही पाठिंबा देऊ असे आश्वासनही त्यांनी दिले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे तीन दिवसाच्या भारत दौ-यावर असून आज दुपारी हैद्राबाद हाऊसमध्ये ओबामा आणि मोदी यांच्यात सुमारे दीड ते दोन तास चर्चा झाली. या चर्चेनंतर ओबामा आणि मोदी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मोदींनी व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून भारत दौ-यावर आल्याबद्दल ओबामांचे आभार मानले. दोन्ही देशांमधील नैसर्गिक संबंध असून संरक्षण, उत्पादन या क्षेत्रात दोन्ही देश एकमेकांना सहकार्य करतील असे मोदींनी सांगितले. दहशतवादाविरोधात लढण्यात दोन्ही देशांमध्ये एकमत असल्याचा पुनरुच्चार मोदींनी केला. तर ओबामा यांनीही भारतीयांच्या आदरातिथ्यामुळे भारावून गेल्याचे सांगितले. भारतासोबतचे संबंध नव्या उंचीवर न्यायचे आहेत असेही त्यांनी नमूद केले.
ओबामांच्या या दौ-यात अणु करार मार्गी लागेल अशी चर्चा आहे. याविषयी ओबामांनी सकारात्मक विधान केले. दोन्ही देशांमध्ये अणु करारातील दोन महत्त्वाच्या मुद्यांवर सहमती झाल्याचे त्यांनी सांगितले. संरक्षण, उर्जानिर्मिती, सौरउर्जा या क्षेत्रांविषयी भारतासोबत सहकार्य करु असे त्यांनी सांगितले. तर नागरी अणु कराराचे व्यावसायिक परिणाम आता दिसून येतील असे सूचक विधान मोदींनी केले.
हिंदीचा वापर
नमस्ते, नमस्कार, भारतवासीयों को मेरा प्यार भरा नमस्कार असे सांगत त्यांनी भाषणाची सुरुवात केली. 'चाय पे चर्चा' या हिंदी शब्दाचा वापर करुन त्यांनी भारतीयांवर स्वतःची छाप पाडण्याचा प्रयत्न केला.