...तर तब्बल 1 अब्ज लोकसंख्येला पाणी मिळणंही होईल कठीण; IIT संशोधकांचा रिसर्चमधून मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 09:16 AM2021-06-15T09:16:33+5:302021-06-15T09:30:14+5:30

One billion people will not get water if himalayan glaciers stopped melting : हिमनद्या संकुचित होत आहेत आणि हिमालय-काराकोरम पर्वतरांगामध्ये हवामान बदलामुळे विविध प्रकारचे धोके निर्माण होत आहेत.

indore iit professor says one billion people will not get water if himalayan glaciers stopped melting | ...तर तब्बल 1 अब्ज लोकसंख्येला पाणी मिळणंही होईल कठीण; IIT संशोधकांचा रिसर्चमधून मोठा खुलासा

...तर तब्बल 1 अब्ज लोकसंख्येला पाणी मिळणंही होईल कठीण; IIT संशोधकांचा रिसर्चमधून मोठा खुलासा

googlenewsNext

नवी दिल्ली - हवामान बदलांमुळे हिमालयातील बर्फ अधिक वेगानं वितळत आहे. हिमनद्या संकुचित होत आहेत आणि हिमालय-काराकोरम पर्वतरांगामध्ये हवामान बदलामुळे विविध प्रकारचे धोके निर्माण होत आहेत. हिमनद्या वितळणं थांबल्यास तब्बल एक अब्ज लोकसंख्येला पाणी मिळणं कठीण होऊ शकतं. भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) च्या संशोधनात ही धक्कादायक आता बाब समोर आली आहे. आयआयटीचे सहाय्यक प्राध्यापक फारूक आजम संशोधन सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालं आहे.

एका दशकापेक्षा जास्त काळापासून ते हिमालयीन हिमनद्यांवरील हवामान बदलाच्या परिणामांचा शोध घेत आहेत. "हिमालय-काराकोरमच्या ग्लेशिओ-हायड्रोलॉजी" च्या नवीन संशोधनानुसार, हिमनद्यांवर होणाऱ्या विपरित परिणामामुळे हिमनद्यांवर अवलंबून असलेल्या भारतासह शेजारच्या देशांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे, असे आजम म्हणाले. प्राध्यापक फारूक यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिमालय आणि काराकोरम पर्वतरांगांमधून वितरित होणाऱ्या हिमनद्यांमुळं सुमारे एक अब्जाहून अधिक लोकांना पाणी मिळतं. 

हवामान बदलामुळे या शतकात बहुतेक हिमनग वितळून जातील आणि पाणीपुरवठा खंडित होईल, तेव्हा इतक्या मोठ्या लोकसंख्येला पाणी मिळणार नाही. हिमनगांमधून वितळणारं पाणी आणि हिमनद्यांवरील हवामान बदलाचे परिणाम सिंधू खोऱ्यात लक्षणीयरित्या जाणवत आहे असंही म्हटलं आहे. अचूक माहिती समजून घेण्यासाठी संशोधन पथकाने 250 हून अधिक अभ्यासपूर्ण संशोधन पत्रांचे (Research Paper) निष्कर्ष आता एकत्र केले आहेत. हवामान, तापमानवाढ, पर्जन्यवृष्टी बदल आणि हिमनदी संकोचन यांच्यातील संबंधांविषयी माहिती घेतली जात आहे. 

अमेरिकेच्या प्लॅनेटरी सायन्स इन्स्टिट्यूट, या पेपरचे सह-लेखक जेफ कारगेल यांनी सर्व संशोधन पत्रांच्या निष्कर्षावरून या समस्येवर मार्ग काढण्यासाठी काही उपाय समोर येऊ शकतात असं म्हटलं आहे. उत्तर ब्रिटीश कोलंबिया विद्यापीठाचे सहायक प्राध्यापक आणि अभ्यासाचे सह-लेखक डॉ. जोसेफ शी यांनी हवामानातील फरक निश्चित करण्यात पर्वतांची भूमिका महत्त्वाची आहे.  पावसाळा आणि हिवाळ्यातील वादळांमुळे निर्माण झालेला हवेतील ओलावा नियंत्रित करतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: indore iit professor says one billion people will not get water if himalayan glaciers stopped melting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.