बोहरा समाजाशी माझे घनिष्ठ नातेसंबंध - पंतप्रधान नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 12:26 PM2018-09-14T12:26:42+5:302018-09-14T12:27:12+5:30
इंदूर येथील सैफी मशिदीत आयोजित दाऊदी बोहरा समाजाच्या 'अशरा मुबारका' कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी हजेरी लावली आहे.
इंदूर : इंदूर येथील सैफी मशिदीत आयोजित दाऊदी बोहरा समाजाच्या 'अशरा मुबारका' कार्यक्रमात पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी हजेरी लावली आहे. यावेळी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह बोहरा समाजाचे 53 वे धर्मगुरु मुफद्दल सैफुद्दीन उपस्थित आहेत.
बोहरा समाजाशी असलेल्या घनिष्ठ नातेसंबंधाविषयी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, बोहरा समाजाशी माझे जुने नाते आहे. मी एकप्रकारे या समाजाचा सदस्य बनलो आहे. आज सुद्धा माझे दरवाजे आपल्या परिवारासाठी खुले आहेत.
देशातील जवळपास 50 कोटी गरीब लोकांसाठी आयुषमान योजना सरकारकडून आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून लोकांना एका वर्षात 5 लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार घेता येतील, असेही नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
#WATCH PM Narendra Modi at Saifee Mosque in Indore https://t.co/b0PK8KD2Hs
— ANI (@ANI) September 14, 2018
दरम्यान, बोहरा समाजाचे धर्मगुरु मुफद्दल सैफुद्दीन यांनी भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. या कार्यक्रमात नरेंद्र मोदी सहभागी होणे, ही खूप मोठी गोष्ट आहे, असे मुफद्दल सैफुद्दीन म्हणाले.
Indore: Syedna Mufaddal Saifuddin, spiritual head of the Dawoodi Bohra community felicitates Prime Minister Narendra Modi, at Saifee Mosque pic.twitter.com/FdAUVXlnsC
— ANI (@ANI) September 14, 2018
Ayushman Yojana has come as a savior for about 50 crore poor people of the country. It will ensure free medical treatment worth Rs 5 lakhs in one year. The trial of this scheme is underway: PM Narendra Modi at Saifee Mosque in Indore. #MadhyaPradeshpic.twitter.com/qC8AF7SFks
— ANI (@ANI) September 14, 2018
Bohra samaj ke saath mera rishta bahut purana hai, main ek prakaar se samaaj ka sadasy ban gaya hun. Aaj bhi mere darwaaze aapke parivaar jaanon ke liye khule hain: PM Narendra Modi addressing Dawoodi Bohra community at Saifee Mosque,Indore pic.twitter.com/jSbdIR56Jq
— ANI (@ANI) September 14, 2018