वेदनेने ओरडणाऱ्या रुग्णाला डॉक्टरची मारहाण; HIV पॉझिटिव्ह समजताच संतापला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 12:04 PM2023-10-29T12:04:49+5:302023-10-29T12:10:36+5:30

डॉक्टरने रुग्णाला थप्पड मारल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

indore myh doctor suspended for beating up patient for not disclosing hiv status | वेदनेने ओरडणाऱ्या रुग्णाला डॉक्टरची मारहाण; HIV पॉझिटिव्ह समजताच संतापला अन्...

वेदनेने ओरडणाऱ्या रुग्णाला डॉक्टरची मारहाण; HIV पॉझिटिव्ह समजताच संतापला अन्...

मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये एचआयव्ही बाधित रुग्णाला मारहाण केल्याप्रकरणी महाराजा यशवंतराव रुग्णालयाच्या (MYH) ज्युनियर डॉक्टरला निलंबित करण्यात आले आहे. डॉक्टरने रुग्णाला थप्पड मारल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

45 वर्षीय व्यक्ती, पंचचिरिया, सांवेर येथील रहिवासी, अपघातात त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. जखमीला उज्जैन येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र गंभीर दुखापत असल्याने रुग्णाला उपचारासाठी उज्जैन येथून एमवायएचमध्ये पाठवण्यात आले.

MYH, इंदूर येथील ज्युनियर डॉक्टर आकाश कौशल याला रुग्ण किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी उपचार सुरू होण्यापूर्वी त्याला HIV संसर्गाची माहिती न दिल्याने राग आला. या घटनेच्या व्हिडिओमध्ये ज्युनियर डॉक्टर ड्रेसिंग टेबलवर पडलेल्या रुग्णाला सतत कानाखाली मारताना आणि शिवीगाळ करताना दिसत आहे.

या प्रकरणी एमवायएचचे अधीक्षक डॉ. प्रमेंद्र ठाकूर यांनी सांगितले की, ऑर्थोपेडिक्स आणि ट्रॉमॅटोलॉजी विभागात नियुक्त केलेल्या ज्युनियर डॉक्टरला निलंबित करण्यात आले आहे. ठाकूर म्हणाले की, एमवायएच हे शहरातील शासकीय महात्मा गांधी मेमोरियल मेडिकल कॉलेजशी संलग्न आहे. या प्रकरणाची चौकशी करून तीन दिवसांत अहवाल सादर करण्यासाठी डीन डॉ.संजय दीक्षित यांनी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे.

रुग्णासोबत असलेल्या कुटुंबातील सदस्याने दावा केला की, आम्ही रुग्णाला फ्रॅक्चरच्या उपचारासाठी एमवायएचमध्ये आणले होते. त्याला आधीच एचआयव्हीची लागण आहे. एचआयव्ही संसर्गाबाबत सांगितलं नाही म्हणून कनिष्ठ डॉक्टरांनी त्याला मारहाण केली. मी मध्यस्थी केली तेव्हा मलाही मारलं. पीडित कुटुंबीयांनी या घटनेची तक्रार सीएम हेल्पलाइनवर केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: indore myh doctor suspended for beating up patient for not disclosing hiv status

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.