कौतुकास्पद! दिवसा अभ्यास करतो अन् रात्री सायकलवरून चहा विकतो; 'अशी' सुचली कल्पना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 08:11 PM2022-12-27T20:11:17+5:302022-12-27T20:15:36+5:30

शिक्षण घेणारा हा तरुण सायकल चहासोबतच कोणतेही काम छोटे नसल्याचा संदेश देतो.

indore student of barwani is doing this unique work like cycle wale chai along with studies | कौतुकास्पद! दिवसा अभ्यास करतो अन् रात्री सायकलवरून चहा विकतो; 'अशी' सुचली कल्पना

कौतुकास्पद! दिवसा अभ्यास करतो अन् रात्री सायकलवरून चहा विकतो; 'अशी' सुचली कल्पना

Next

इंदूर शहरात परीक्षेच्या तयारीसाठी आलेल्या एका तरुण चहा विक्रेत्याचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. तुम्ही MBA चहावाला ऐकला असेलच, पण हा आहे सायकल चहा. बडवानी जिल्ह्यातील या विद्यार्थ्याचा व्हिडीओ खूप लोकप्रिय होत आहे. यामध्ये विद्यार्थी दिवसा अभ्यास करतो आणि रात्री सायकलवरून चहा विकतो. इंदूरमध्ये शिक्षण घेणारा हा तरुण सायकल चहासोबतच कोणतेही काम छोटे नसल्याचा संदेश देतो. त्यासाठी फक्त मेहनत आणि मनापासून काम करण्याची गरज आहे.

इंदूर देशातील सर्वात स्वच्छ शहर तसेच शैक्षणिक शहर म्हणून आपला ठसा उमटवत आहे. शहरात शेकडो कोचिंग इन्स्टिट्यूट आहेत, ज्यामध्ये दूरदूरवरून विद्यार्थी परीक्षेची तयारी करण्यासाठी येतात. असाच एक विद्यार्थी आहे बरवानी जिल्ह्यातील अजय खन्ना. हा विद्यार्थी इंजिनीअरिंग केल्यानंतर इंदूरमधून एमबीए करत आहे. इंदूरच्या भंवरकुवानमध्ये सायकलवर चहा विकतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

सायकलने चहा विकणारा अजय खन्ना सांगतो की, तो अभ्यासासोबतच सरकारी नोकरीच्या परीक्षेची तयारी करत आहे. पण नोकरी मिळणे आवश्यक नाही. अशा परिस्थितीत त्याला पर्याय म्हणून काय करता येईल? असा विचार करत असताना त्याला आपल्यासोबत परीक्षेची तयारी करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांचा विचार केला, ज्यांना रात्री अभ्यास करताना झोप उडवण्यासाठी चहाची गरज होती. या कल्पनेला त्याने कामात रूपांतरित केले.

कोणतेही काम छोटे नसते असे तो म्हणतो. अशा परिस्थितीत सायकलवरून बागेत, रस्त्यावर, कोचिंगबाहेर चहा घेऊन जाण्यात त्याला अजिबात संकोच वाटत नाही. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तो हसत हसत त्याच्या रेंजर सायकलवरून चहा घेऊन जात असल्याचे दिसत आहे. तो मोठ्या अभिमानाने चहा विकतो. अजय अभ्यासासोबत स्वत:चा खर्च भागवण्यासाठी हा व्यवसाय करत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप लोकप्रिय झाला असून अजयच्या कामाचं अनेकांनी कौतुक केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: indore student of barwani is doing this unique work like cycle wale chai along with studies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.