नोकरीसाठी नवस केला, पण पूर्ण नाही झाला म्हणून केली मंदिराची तोडफोड; CCTV च्या आधारे अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 09:16 PM2023-01-05T21:16:49+5:302023-01-05T21:18:11+5:30
मध्य प्रदेशच्या इंदौरमध्ये देवाला केलेला नवस पूर्ण झाला नाही म्हणून एकानं मंदिराची तोडफोड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
मध्य प्रदेशच्या इंदौरमध्ये देवाला केलेला नवस पूर्ण झाला नाही म्हणून एकानं मंदिराची तोडफोड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. हिंदू संघटनेनं या घटनेची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी शुभम कैथवास नावाच्या व्यक्तीला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारानं अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शुभम कैथवास नावाचा व्यक्ती नवस पूर्ण झाला नाही म्हणून नाराज होता. यासाठी त्यानं इंदौरच्या चंदन नगर आणि छत्रीपुरा ठाणे हद्दीतील मंदिरांमध्ये तोडफोड केली. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज जेव्हा समोर आलं तेव्हा काही संघटनांनी विरोध करत तक्रार केली आणि आरोपीला अटक केली आहे.
युवक बेरोजगार होता असं सांगितलं होतं. नोकरी मिळावी किंवा हाताला काम मिळावं यासाठी त्यानं मंदिरात एक तांब्या जल अर्पण करुन नवस केला. पण केलेला नवस पूर्ण झाला नाही यामुळे तो नाराज होता. त्यानं एका रात्रीत छत्रीपुरा आणि चंदनगनर ठाणे हद्दीतील दोन मंदिरांची तोडफोड केली. त्यानं मंदिरातील मूर्तींचंही नुकसान केलं आहे. यानंतर काही संघटनांनी यावर संताप व्यक्त करत पोलिसात तक्रार केली.
आरोपीनं पोलिसांना काय सांगितलं?
पोलिसांनी या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजचा तपास करुन शुभव कैथवास या तरुणाला अटक केली. चौकशीत त्यानं पोलिसांना एक अडचणी होती त्यामुळे आपण मंदिरात जाऊन प्रार्थना करायचो पण देवानं दुसऱ्यांचं ऐकलं, माझं कधी ऐकलं नाही. त्यामुळे आपण नाराज होतो आणि रागाच्या भरात तोडफोड केली, असं सांगितलं आहे.