भारतीयांसाठी उद्या मोठा दिवस; शक्तीशाली योद्धे देशसेवेसाठी झेपावणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 04:13 PM2020-09-09T16:13:52+5:302020-09-09T16:20:03+5:30
राफेल विमाने 27 जुलैरोजी भारतात आली होती. यानंतर इथे त्यांची चाचणी घेण्यात आली. आता ही पाच लढाऊ विमाने हवाई दलाच्या 17 वी स्क्वाड्रन 'गोल्डन अॅरोज' चा भाग बनणार आहेत.
एलएसीवरील चीनच्या कुरापतींमुळे तणावाचे वातावरण वाढलेले असताना आता एक मोठी बातमी येत आहे. फ्रान्सहून जुलैच्या शेवटच्या आठवड्यात भारतात आलेली खतरनाक राफेल लढाऊ विमाने देशसेवेसाठी झेपावणार आहेत. हवाई दलाला उद्या मोठी ताकद मिळणार असून अंबाला हवाई तळावर अधिकृतरित्या ही पाच विमाने कार्यरत होणार आहेत.
Indian Air Force will formally induct Rafale aircraft on 10th September 2020 at Air Force Station, Ambala. The aircraft will be part of 17 Squadron,the 'Golden Arrows'. First five Indian Air Force Rafale aircraft arrived at Air Force Station from France on July 27: IAF (File pic) pic.twitter.com/xL1eGlvIRA
— ANI (@ANI) September 9, 2020
भारतासाठी आणि हवाई दलासाठी हा क्षण खूप महत्वाचा असणार आहे. यासाठी मोठमोठे अधिकारी आणि मंत्री अंबाला विमानतळावर पोहोचणार आहेत. यामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, फ्रान्सचे सशस्त्र सैन्याचे मंत्री फ्लोरेंन्स पार्ले देखील सहभागी होणार आहेत. दोन्ही नेते प्रमुख पाहुणे असणार आहेत.
Reliance Jio दणका करणार; स्वस्त किंमतीचे 1 कोटी स्मार्टफोन विकणार
याशिवाय सीडीएस बिपीन रावत, हवाई दल प्रमुख आरकेएस भदोरिया, सुरक्षा सचिव डॉ अजय कुमार, संरक्षण विभागाचे सचिव डॉ जी सतीश रेड्डी आणि डीआरडीओचे अध्यक्षदेखील येणार आहेत. तसेच संरक्षण मंत्रालयाचे अन्य अधिकारीही उपस्थित राहणार आहेत.
राफेल विमाने 27 जुलैरोजी भारतात आली होती. यानंतर इथे त्यांची चाचणी घेण्यात आली. आता ही पाच लढाऊ विमाने हवाई दलाच्या 17 वी स्क्वाड्रन 'गोल्डन अॅरोज' चा भाग बनणार आहेत. या प्रसंगी फ्रान्सच्या संरक्षण क्षेत्राचे एक मोठे प्रतिनिधी मंडळही भारतात येत आहे. यामध्ये राफेलची कंपनी दसॉल्ट एव्हीएशनचे अध्यक्ष एरिक ट्रैपियर, मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक बरनेंगर हे देखील आहेत.
कंगनाला विनाकारण बोलायची संधी दिली, प्रसिद्धी दिली; शरद पवारांनी शिवसेनेचे कान टोचले
राफेल विमानांची पारंपरिक पद्धतीने सर्व धर्म पूजा केली जाणार आहे. यानंतर राफेल लढाऊ विमान, तेजस आणि सारंग एअरोबेटिक टीम आकाशात झेपावणार आहेत. तसेच हवाई कसरती करणार आहेत. यानंतर राफेल विमानांना पाण्याचा फवारा मारून सलामी दिली जाणार आहे. यानंतर दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा देखील होणार आहे.
खळबळजनक! पत्नीलाही पाठवायचा ग्राहकांकडे; ऑनलाईन सेक्स रॅकेटचे ट्विटरवरून बिंग फुटले