आता लष्करामध्ये रणरागिणीही दाखवणार शौर्य, निर्मला सीतारमन यांनी घेतला ऐतिहासिक निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2019 08:46 PM2019-01-18T20:46:45+5:302019-01-18T20:56:30+5:30
महिलांना लष्करातील सैनिकी विभागात प्रवेश देण्याचा ऐतिहासिक निर्णय संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांनी घेतला आहे
नवी दिल्ली - आज बदललेल्या काळात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत. अनेक क्षेत्रामध्ये महिलांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. मात्र लष्करामधील सैनिकी विभागात आतापर्यंत प्रवेश दिला जात नव्हता. पण आता महिलासुद्धा लष्कराच्या सैनिकी विभागात भरती होऊन शत्रूशी दोन हात करताना दिसणार आहेत. महिलांना लष्करातील सैनिकी विभागात प्रवेश देण्याचा ऐतिहासिक निर्णय संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांनी घेतला आहे.
महिलांना लष्करामधील वैद्यकीय तसेच इतर काही विभागात प्रवेश दिला जात होता. मात्र प्रत्यक्ष रणांगणाशी संबंधित असलेल्या सैनिकी विभागात आतापर्यंत महिलांना प्रवेश दिला जात नसे. दरम्यान, संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांनी ऐतिहासिक निर्णय घेताना महिलांच्या सैनिकी विभागातील प्रवेशाबाबत असलेला अडथळा दूर केला आहे. आता महिलांनाही लष्कराच्या सैनिकी विभागात सामावून घेतले जाणार आहे. संपूर्ण प्रक्रियेंतर्गत 20 टक्के महिलांना सैनिकी विभागात प्रवेश दिला जाईल.
Defence Minister Nirmala Sitharaman takes decision to induct women as jawans in Corps of Military Police in Army. The women will be inducted in a graded manner to eventually comprise 20 per cent of total Corps of Military Police of the Army. pic.twitter.com/wkyVw5CmCD
— ANI (@ANI) January 18, 2019