तेव्हा चर्चिल म्हणाले होते, भारतीय नेत्यांमध्ये गुणवत्ता नाही; अन् आज...; आनंद महिंद्रांनी दाखवला 'आरसा'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 01:38 PM2022-10-25T13:38:17+5:302022-10-25T13:41:47+5:30
उद्योगपती आनंद महिंद्रा नेहमी आपल्या ट्विटमुळे चर्चेत असतात. आता आज पुन्हा महिंद्रा यांचे एक ट्विट व्हायरल झाले आहे.
उद्योगपती आनंद महिंद्रा नेहमी आपल्या ट्विटमुळे चर्चेत असतात. आता आज पुन्हा महिंद्रा यांचे एक ट्विट व्हायरल झाले आहे. आनंद महिंद्रा यांनी ब्रिटनचे नवे पंतप्रधान भारतीय वंशाचे ऋषी सुनक (Rishi Sunak)यांचे अभिनेदन केले आहे. त्यांनी या ट्विटमध्ये महिंद्रा यांनी १९४७ सालच्या एका विधानाचा दाखला दिला आहे.महिंद्रा यांचे ट्विट प्रचंड चर्चेत आले आहे.
ऋशी सुनक यांचे अभिनंदन करण्यासोबतच त्यांनी अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामुळे प्रत्येक भारतीयाची मान अभिनाने उंचावणार आहे. आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटमध्ये ब्रिटनचे माजी पंतप्रधान चर्चिल यांच्या जुन्या विधानाचा संदर्भ दिला आहे.
In 1947 on the cusp of Indian Independence, Winston Churchill supposedly said “…all Indian leaders will be of low calibre & men of straw.” Today, during the 75th year of our Independence, we’re poised to see a man of Indian origin anointed as PM of the UK. Life is beautiful…
— anand mahindra (@anandmahindra) October 24, 2022
उद्योगपती आनंद महिंद्रा नेहमी त्यांच्या ट्विटमुळे चर्चेत असतात. त्यांचे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. यावेळी आनंद महिंद्रा यांनी ब्रिटनचे माजी पंतप्रधान चर्चिल यांच्या जुन्या विधानाचा संदर्भ दिला आहे.
"१९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यादरम्यान, चर्चिल यांनी कथितपणे म्हटले होते की 'भारतातील सर्व नेते कमी क्षमतेचे असतील. आज आपल्या स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष आहे' आपण भारतीय वंशाच्या व्यक्तीला यूकेचे पंतप्रधान म्हणून पाहण्यास तयार आहे, असं ट्विटमध्ये आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे.
आनंद महिंद्रा यांचे हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. या ट्विटला आतापर्यंत ७० हजार जणांनी लाईक केले, आणि जवळपास १० हजार वेळा रिट्विट केले.