Coronavirus: ...तर आपण विश्वासार्ह जागतिक शक्ती बनू; मोदींच्या महापॅकेजचं उद्योगजगताकडून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 08:19 AM2020-05-13T08:19:07+5:302020-05-13T08:24:13+5:30

पंतप्रधानांनी मंगळवारी 20 लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले, जे देशाच्या जीडीपीच्या 10 टक्के आहे.

industrialist reaction on economic package india announce by prime minister vrd | Coronavirus: ...तर आपण विश्वासार्ह जागतिक शक्ती बनू; मोदींच्या महापॅकेजचं उद्योगजगताकडून कौतुक

Coronavirus: ...तर आपण विश्वासार्ह जागतिक शक्ती बनू; मोदींच्या महापॅकेजचं उद्योगजगताकडून कौतुक

Next
ठळक मुद्दे  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांचे प्रोत्साहन पॅकेज उद्योगजगतातून जोरदार स्वागत करण्यात आलं आहे. पंतप्रधानांनी मंगळवारी 20 लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले, जे देशाच्या जीडीपीच्या 10 टक्के आहे.कोरोना विषाणूच्या साथीच्या आजाराने घसरलेली अर्थव्यवस्था प्रगतिपथावर नेण्यास मदत होईल

नवी दिल्लीः  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांचे प्रोत्साहन पॅकेज उद्योगजगतातून जोरदार स्वागत करण्यात आलं आहे.  ही काळाची गरज असल्याचेही उद्योगजगतानं सांगितलं आहे. कोरोना विषाणूच्या साथीच्या आजाराने घसरलेली अर्थव्यवस्था प्रगतिपथावर नेण्यास मदत होईल. तसेच लॉकडाऊन घालण्यात आलेल्या निर्बंधानंतरही अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करणं शक्य होणार आहे. आर्थिक प्रगतीला नवीन गती मिळणार आहे, असं मत उद्योग मंडळानं व्यक्त केलं आहे. पंतप्रधानांनी मंगळवारी 20 लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले, जे देशाच्या जीडीपीच्या 10 टक्के आहे.

त्यानंतर आनंद महिंद्रा यांनीसुद्धा ट्विट करत पंतप्रधान मोदींवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. आनंद महिंद्रा यांनी ट्वीट केले की, 'पंतप्रधानांचे कार्पे डायम (दिवस जप्त करणारं) भाषण होतं, संधीच्या रुपातून जगण्याच्या प्रयत्नांचा दृष्टिकोन बदलेल अन् त्याला सामर्थ्याचं रूप प्राप्त होईल. हा बदल 1991च्या धर्तीवर होईल की नाही याची आम्हाला उद्या (बुधवारी) खात्री पटेल. पण आज रात्री मला नीट झोप येणार नाही, असे मला वाटते.

 
'भारत विकासाच्या मार्गावर येईल'
शेतकरी, श्रमिक, गरीब, मध्यम वर्गासह समाजातील सर्व घटकांसोबत कुटीर, सूक्ष्म, लघु-मध्यम उद्योगाला दिलासा देण्यासाठी घोषित २० लाख कोटींच्या विशेष आर्थिक योजनेमुळे स्वावलंबी भारताला गती मिळेल. सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने घोषित केलेल्या निर्णयांसह हे विशेष आर्थिक पॅकेज २० लाख कोटींचे असेल. ते देशाच्या ढोबळ उत्पादनाच्या (जीडीपी) १० टक्के आहे. 

उद्योग चेंबर सीआयआयचे महासंचालक चंद्रजित बॅनर्जी म्हणाले, "पंतप्रधान जमीन, कामगार, रोख आणि कायदा सुलभ करण्याच्या विषयावर बोलले, आम्ही त्यांचे कौतुक करतो." हे अर्थव्यवस्थेसाठी एक मोठे आव्हान आहे. या चार क्षेत्रातील सुधारणांमुळे संकटांच्या या घडीत आर्थिक विकासाला नवीन गती मिळेल. ”फिक्की अध्यक्ष संगीता रेड्डी म्हणाल्या की, अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा, व्यवस्था, लोकसंख्या आणि मागणी वाढल्यास भारत पुन्हा प्रगतिपथावर  येईल. असोचेम आणि नरेडकोचे अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी म्हणाले की, हे पॅकेज अर्थव्यवस्थेला गती देईल. हे खरोखर कौतुकास्पद पॅकेज आहे. अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची आम्ही वाट पाहत होतो." पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष डीके अग्रवाल म्हणाले की, प्रोत्साहन पॅकेज ही काळाची गरज आहे. हे पॅकेज अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत करेल आणि आर्थिक हालचालींना वेग देईल. 

Web Title: industrialist reaction on economic package india announce by prime minister vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.