कुख्यात गांजा तस्कर शेरू जेरबंद

By admin | Published: June 29, 2015 12:38 AM2015-06-29T00:38:27+5:302015-06-29T00:38:27+5:30

६ किलो गांजा जप्त : गुन्हे शाखा पोलिसांची कामगिरी

The infamous ganja smuggler Shiro Jeraband | कुख्यात गांजा तस्कर शेरू जेरबंद

कुख्यात गांजा तस्कर शेरू जेरबंद

Next
किलो गांजा जप्त : गुन्हे शाखा पोलिसांची कामगिरी
नागपूर : गेल्या दीड वर्षांपासून गांजा तस्करीत गुंतलेला आणि आतापर्यंत शेकडो किलो गांजा विकणारा कुख्यात गांजा तस्कर शेरू ऊर्फ रामसिंग जवल मांझी याला गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी दुपारी वाडीत जेरबंद केले. मूळचा ओरिसामधील रहिवासी असलेला शेरू आंध्र प्रदेशातील गांजा तस्करांशी जुळलेला आहे. त्याने नागपुरात यापूर्वी अनेकदा गांजाची खेप आणून विकली आहे. तो नागपूर शहराच्या आजूबाजुला वाडी, एमआयडीसी, दिघोरी, काटोल नाका, मानकापूर, बेसा अशा भागात गांजा आणतो आणि झटपट विकून निघून जातो. गुन्हे शाखेचे पथक त्याच्या पाळतीवर अनेक दिवसांपासून होते. तो रविवारी वाडीत येणार असल्याची माहिती कळताच गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने त्याच्या अटकेची तयारी केली. त्यानुसार सिद्धार्थ चौक, कंट्रोल वाडी, आंबेडकरनगर येथे मुक्कामी असलेल्या शेरूकडे छापा घालून ६ किलो गांजा जप्त करण्यात आला. या गांजाची किंमत ६० हजार रुपये आहे. पोलीस निरीक्षक पंडितराव सोनवणे, हवालदार दत्ता बागुल, गणेश लढे, विठोबा काळे, शिपाई किशोर महंत, नितीन रांगणे, दत्ता घुगल, गणेश घुगुलकर, सतीश पाटील, तुलसी शुक्ला, महिला शिपाई रुबीना शेख यांनी ही कामगिरी बजावली.
----
कुख्यात अनिल मल्लेवार हद्दपार
नागपूर : गणेशपेठ परिसरातील गुन्हेगार अनिल भगवान मल्लेवार (वय ४२, रा. गुजरवाडी) याला परिमंडळ ३ च्या उपायुक्तांनी दोन वर्षांकरिता हद्दपार केले आहे. अनिलविरुद्ध चोरी, जबरी चोरी, दुखापत आणि प्रतिबंधक अशाप्रकारचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
---

Web Title: The infamous ganja smuggler Shiro Jeraband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.