२४ राज्यांत संसर्गवाढ १५ टक्क्यांहून अधिक; सातारा, सोलापूरसहित ३० जिल्ह्यांत नव्या रुग्णांमध्ये मोठी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 03:10 AM2021-05-09T03:10:40+5:302021-05-09T03:11:30+5:30

त्या म्हणाल्या की, देशातील ३० जिल्ह्यांमध्ये नव्या रुग्णांच्या वाढीचे प्रमाण अधिक आहे. त्यातल्या २० जिल्ह्यांत हे प्रमाण आणखी वाढलेले असून, ते जिल्हे दक्षिण भारतातील केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांतील आहेत. 

Infection rate rises to more than 15 per cent in 24 states; Large increase in new patients in 30 districts including Satara and Solapur | २४ राज्यांत संसर्गवाढ १५ टक्क्यांहून अधिक; सातारा, सोलापूरसहित ३० जिल्ह्यांत नव्या रुग्णांमध्ये मोठी वाढ

२४ राज्यांत संसर्गवाढ १५ टक्क्यांहून अधिक; सातारा, सोलापूरसहित ३० जिल्ह्यांत नव्या रुग्णांमध्ये मोठी वाढ

Next

नवी दिल्ली : गेल्या आठवड्यात देशातील २४ राज्यांमध्ये संसर्गवाढीचे प्रमाण १५ टक्क्यांहून अधिक होते. गेल्या दोन आठवड्यांत ३० जिल्ह्यांमध्ये नव्या रुग्णांच्या वाढीचे मोठे प्रमाण आहे. त्यात महाराष्ट्रातील सातारा, सोलापूर जिल्ह्यांचा समावेश आहे. ही अतिशय चिंताजनक स्थिती असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.  (Infection rate rises to more than 15 per cent in 24 states; Large increase in new patients in 30 districts including Satara and Solapur)

या खात्याच्या अतिरिक्त सचिव आरती अहुजा यांनी सांगितले की, सात राज्यांमध्ये कोरोना संसर्गवाढीचा दर ३० टक्क्यांहून अधिक आहे. गोवा (४८.५ टक्के), हरयाणा (३६.१ टक्के), पुदुचेरी (३४.९ टक्के), पश्चिम बंगाल (३३.१ टक्के), कर्नाटक, दिल्ली, राजस्थान प्रत्येकी (२९.९ टक्के) असे हे प्रमाण आहे. १२ राज्यांमध्ये १ लाखांपेक्षा अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर सात राज्यांमध्ये ५० हजार ते १ लाख इतक्या लोकांवर उपचार सुरू आहेत. ५ टक्क्यांपेक्षा कमी संसर्गवाढ असलेली अवघी तीन राज्ये असून नऊ राज्यांमध्ये हे प्रमाण ५ ते १५ टक्क्यांदरम्यान आहे.

त्या म्हणाल्या की, देशातील ३० जिल्ह्यांमध्ये नव्या रुग्णांच्या वाढीचे प्रमाण अधिक आहे. त्यातल्या २० जिल्ह्यांत हे प्रमाण आणखी वाढलेले असून, ते जिल्हे दक्षिण भारतातील केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांतील आहेत. 

Web Title: Infection rate rises to more than 15 per cent in 24 states; Large increase in new patients in 30 districts including Satara and Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.