स्थलांतरित परतलेल्या राज्यांपैकी सहा राज्यांत संसर्ग वाढला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 06:08 AM2020-06-11T06:08:57+5:302020-06-11T06:09:29+5:30
रुग्णसंख्येत झाली वाढ : उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, आसामचा समावेश
नवी दिल्ली : देशाच्या विविध भागात काम करीत असलेले कामगार आपापल्या राज्यात परतल्यानंतर, यापैकी ६ राज्यांमध्ये रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या वाढल्याचे समोर आले आहे. १५ दिवसांतील रुग्णसंख्येचा अभ्यास केल्यानंतर, मोठ्या संख्येने स्थलांतरित कामगार परतलेल्या उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आसाम या राज्यांतील रुग्णांचे प्रमाण वाढल्याचे सिद्ध झाले. इतर राज्यांच्या तुलनेत हे प्रमाण जास्त आहे.
या ६ राज्यांमध्ये १ मेपासून रुग्णसंख्या वाढण्याचे प्रमाण ८.२ पटीने जास्त आहे. उर्वरित राज्यांमध्ये हे प्रमाण ७ पट इतके आहे. स्थलांतरित कामगार आपल्या मूळगावी परतल्यानंतरच या ६ राज्यांमध्ये संसर्ग झपाट्याने वाढला.
गत ३ आठवड्यांपासून ६ राज्यांमध्ये नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण सातत्याने वाढत गेल्याचे दिसते. यापैकी उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आसाम आणि झारखंड या ४ राज्यांत नवे रुग्ण आढळण्याचे साप्ताहिक प्रमाण आजवर सर्वाधिक आहे. या तुलनेत बिहार आणि ओडिशात आढळणाऱ्या नव्या रुग्णांचे प्रमाण थोडे कमी आहे, असे आरोग्य यंत्रणांकडून सांगण्यात येते. (वृत्तसंस्था)
च्८ जून या दिवशीची रुग्णसंख्या लक्षात घेता, देशातील एकूण रुग्णांपैकी १२ टक्के रुग्ण उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आसाममधील आहेत. १ मे रोजी हे प्रमाण १०.५ टक्के होते.
च्याशिवाय १ ते ७ मे या काळात देशात आढळलेल्या नव्या रुग्णांपैकी
८ टक्के रुग्ण या ६ राज्यांतून होते. २ ते ८ जून या आठवड्यात हे प्रमाण दुप्पट म्हणजे १६ टक्के इतके झाले आहे.
टेस्टच्या प्रमाणात वाढ
च्६ राज्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढण्यामागे टेस्टची वाढलेली संख्या कारणीभूत असल्याचे कारण देण्यात येत आहे. मात्र, याच काळात संपूर्ण देशभर टेस्ट आणि रुग्णांची संख्या वाढल्याने हा मुद्दा गैरलागू ठरतो.