निकृे्ट दर्जाचे रस्ता काम ग्रामस्थांनी पाडले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 09:21 PM2021-03-30T21:21:15+5:302021-03-30T21:21:44+5:30

नायगाव : सिन्नर व निफाड या दोन तालुक्यांना जोडणा-या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने परिसरातील ग्रामस्थांनी हे काम बंद पाडले आहे.निकृष्ट व कासवगतीने होत असलेल्या अडीच किलोमीटर अंतराचे काम दोन वर्ष होऊनही अपूर्णच असल्यामुळे प्रवाशी नाराजी व्यक्त करत आहे.

Inferior road works closed by villagers | निकृे्ट दर्जाचे रस्ता काम ग्रामस्थांनी पाडले बंद

निकृे्ट दर्जाचे रस्ता काम ग्रामस्थांनी पाडले बंद

Next
ठळक मुद्देसिन्नर-निफाड या दोन तालुक्यांना जोडणा-या रस्त्यावर चालु होते काम

नायगाव : सिन्नर व निफाड या दोन तालुक्यांना जोडणा-या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने परिसरातील ग्रामस्थांनी हे काम बंद पाडले आहे.निकृष्ट व कासवगतीने होत असलेल्या अडीच किलोमीटर अंतराचे काम दोन वर्ष होऊनही अपूर्णच असल्यामुळे प्रवाशी नाराजी व्यक्त करत आहे.

सिन्नर तालुक्यातील नायगाव व निफाड तालुक्यातील पिंपळगाव निपाणी या दोन तालुक्यांना जोडणा-या अडीच किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू आहे. मात्र सुरु असलेले काम संबंधित ठेकेदार मनमानी करून निकृष्ट दर्जाचे होत आहे.
या रस्त्यावर चार ठिकाणी नाल्यांवर मो-यांची गरज असतांना येथे अरूंद रस्ता बनविल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. रस्त्यावर टाकली जाणारी खडी निकृष्ट असून डांबराचे प्रमाण अल्प असल्याने रस्ता आत्ताच उखडत असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली आहे.

गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी होती. मात्र सदर रस्ता दोन वर्षापासून काम सुरू असुन अजूनही पूर्ण झाले नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.अपूर्ण कामामुळे परिसरातील पिंपळगाव, तळवाडे, महाजनपूर, भेंडाळी, बेरवाडी व नायगाव आदी गावातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

सदर ठेकेदार रस्त्याचे काम खराब करत असल्याची तक्रार करूनही संबंधित अधिकारी आणि गावातील काही अज्ञात व्यक्ती कामाला मदत करत असल्याची तक्रार मंगेश कातकाडे, सुनिल कातकाडे, भारत जेजुरकर, मारूती भांगरे, महेंद्र साठे आदींसह ग्रामस्थ करत आहे.
सिन्नर - निफाड या दोन तालुक्याना जोडणा-या नायगाव - पिंपळगाव या रस्त्याच्या निकृष्ट दर्जाचे होत असलेले काम.

Web Title: Inferior road works closed by villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.