एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना निकृष्ट दर्जाची सुरक्षा साधने; संघटनेची मंत्र्यांकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 12:13 AM2020-04-01T00:13:24+5:302020-04-01T06:28:14+5:30

वैमानिक व विमान कर्मचारी मोठ्या शहरांमध्ये व गजबजलेल्या सोसायट्यांमध्ये राहतात.

 Inferior security equipment to Air India employees | एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना निकृष्ट दर्जाची सुरक्षा साधने; संघटनेची मंत्र्यांकडे तक्रार

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना निकृष्ट दर्जाची सुरक्षा साधने; संघटनेची मंत्र्यांकडे तक्रार

Next

नवी दिल्ली : ‘लॉकडाउन’मुळे देशातील व परदेशातील सर्व विमानसेवा बंद असूनही अत्यावश्यक कामांसाठी विशेष विमाने चालविणाºया एअर इंडियाच्या वैमानिकांना व अन्य विमान कर्मचाऱ्यांना दिली जाणारी व्यक्तिगत सुरक्षा उपकरणे (पीपीई) निकृष्ट दर्जाची असल्याने त्यांना व त्यांच्यापासून इतरांना कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती आहे, अशी तक्रार नागरी विमान वाहतूकमंत्री हरदीप सिंग पुरी यांच्याकडे करण्यात आली आहे.

‘एक्झिक्युटिव्ह पायलट््स असोसिएशन’ने मंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात लिहिले की, विशेष विमाने चालविताना दिले जाणारे सुरक्षा पोषाख खूपच अघळपघळ, हालचाल करताना अडचणीचे वाटणारे व सहजपणे फाटू शकतील असे अगदी पातळ प्लॅस्टिकचे आहेत. सॅनिटायझर पुरेशा संख्येने उपलब्ध नसतात व विमानाचे आणि त्यात भरल्या जाणाºया सामानाचे निर्जंतुकीकरणही धडपणे केले जात नाही.

संघटना म्हणते की, हे वैमानिक व विमान कर्मचारी मोठ्या शहरांमध्ये व गजबजलेल्या सोसायट्यांमध्ये राहतात. या उणिवांमुळे दुर्दैवाने त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला तर नकळतपणे तो इतरांमध्येही पसरण्याचा धोका आहे.

वैमानिक व विमान कर्मचारी किती जोखीम पत्करून व अडचणी सोसून हे काम करतात याची कल्पना येण्यासाठी, आरामशीर घरी बसलेल्या, कार्मिक, वित्त अशा अन्य विभागांतील एखाद-दोन अधिकाºयांनाही अशा विशेष विमानांमध्ये मुद्दाम ड्युटी लावण्यात यावी, असेही संघटनेचे म्हणणे आहे.

अंतर्गत आरोग्यसेवा हवी सक्रिय

या आणीबाणीच्या काळात एअर इंडियाच्या स्वत:च्या आरोग्य विभागाला टाळे ठोकलेले आहे व डॉक्टर व अन्य कर्मचारी फक्त फोनवरून शंकांचे निरसन करून सल्ला देण्यापुरते ‘वर्क फ्रॉम होम’ करीत आहेत, याकडे लक्ष वेधून कंपनीच्या अंतर्गत आरोग्यसेवेने अशा वेळी अधिक सक्रियतेने काम करायला हवे, असे पत्रात सुचविण्यात आले आहे.

Web Title:  Inferior security equipment to Air India employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.