Inflation: पेट्रोलनंतर नवरदेवाला आणखी एक महागडं गिफ्ट, गुजरातचं लग्न आलं चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 07:43 AM2022-04-17T07:43:44+5:302022-04-17T07:46:09+5:30
तामिळनाडूतील एका लग्नात काही दिवसांपूर्वी नरवदेवाच्या मित्रांनी जोडप्याला लग्नाचे गिफ्ट म्हणून चक्क पेट्रोल आणि डिझेल गिफ्ट केले होते
मुंबई - देशात महागाईने जनता त्रस्त झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे दुध, भाजीपाला आणि अत्यावश्यक वस्तूंच्या किंमतीतही मोठ्या प्रमाणात वाझ होताना दिसत आहे. आता कुठे कोरोनाचे संकट दूर होऊन सामान्यांचे जनजीवन सुरळीत होत असताना पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वच जीवनावश्य वस्तू महागल्या आहेत. त्यात, दररोजच्या ताटातील भाज्यांचे आणि फळांचीही चांगलीच भाववाढ पाहायला मिळते. या दरवाढीचा निषेध नोंदविण्याचा वेगळाच फंडा काही तरुणाईने सुरू केला आहे.
तामिळनाडूतील एका लग्नात काही दिवसांपूर्वी नरवदेवाच्या मित्रांनी जोडप्याला लग्नाचे गिफ्ट म्हणून चक्क पेट्रोल आणि डिझेल गिफ्ट केले होते. बरेचदा मित्रमंडळी आपल्या मित्रांच्या लग्नात काही ना काही अनोखे गिफ्ट देत असल्याचे फोटो आणि व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यात, आता महागाईच्या निषेधाची भर पडताना दिसत आहे. पेट्रोल डिझेलनंतर आता गुजरातच्या राजकोट येथील एका लग्नात मित्रांनी नवरदेवाला चक्क लिंबू भेट दिले आहेत.
गुजरात: राजकोट के धोराजी शहर में एक शादी समारोह के दौरान लोगों ने दूल्हे को नींबू भेंट किए।
— ANI_HindiNews (@AHindinews) April 17, 2022
दिनेश ने बताया, "इस समय राज्य और देश में नींबू की कीमतें बहुत बढ़ गई हैं। इस मौसम में नींबू की बहुत जरूरत पड़ती है। इसलिए मैंने नींबू भेंट किए हैं।" (16.04) pic.twitter.com/ciQ9MlwIC3
राजकोटच्या धोराजी शहरातील एका लग्नसमारंभात लोकांनी नवरदेवाला चक्क किलोभर लिंबू भेट दिले आहेत. सध्या राज्यात आणि देशात लिंबांच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यातच, उन्हाळा असल्याने लिंबांची मागणी आणि गरज मोठी आहे. त्यामुळे, आम्ही नवरदेवास लिंबू भेट दिल्याचं नवरदेवाचे मित्र दिनेश यांनी म्हटलं आहे. दरम्यान, वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमुळे फळे आणि भाजीपाल्याचे भाव वधारले आहेत. लिंबू चक्क 250 ते 300 रुपये किलोपर्यंत पोहोचले असू कलिंगडही महागले आहेत.
पेट्रोल अन् डिझेल गिफ्ट
तामिळनाडूतील ग्रेस कुमार आणि किर्तना यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली. लग्नाला जाताना आपण नेहमीच काही ना काही गिफ्ट देत असतो. आपल्या शुभेच्छांबरोबरच हे गिफ्ट त्या जोडप्यासाठी कायम आठवण म्हणून त्यांच्या सोबत राहावे असा आपला त्यामागील उद्देश असतो. यामध्ये कपड्यांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंचा समावेश असतो. नव्या आयुष्याला सुरुवात करताना शुभेच्छा म्हणून दिले जाणारे हे गिफ्ट काहीतरी खास असावे असे आपल्याला कायम वाटते. असाच विचार करुन या मित्रमंडळींनी आपल्या मित्राला नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी १ लीटर पेट्रोल आणि १ लीटर डिझेल दिले होते.