महागाई तीन महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर; काय स्वस्त अन् काय महाग?, जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 05:36 AM2023-07-13T05:36:53+5:302023-07-13T05:37:30+5:30
तेल स्वस्त, डाळी महाग, मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी उत्पादनांचे नुकसान झाले, तर अनेक ठिकाणी पाऊस नसल्याने उत्पादनच निघाले नसल्याने किमती वाढल्या आहेत.
नवी दिल्ली - खाद्य उत्पादनांच्या किमती वाढल्याने जूनमध्ये पुन्हा एकदा महागाईत वाढ झाली आहे. ती ४.८१ टक्क्यांवर पोहोचली आहे. मे महिन्यात किरकोळ महागाई २५ महिन्यांच्या नीचांकी स्तरावर पोहोचली होती. मात्र, आता जूनमध्ये भाज्यांच्या वाढलेल्या किमतीमुळे महागाई वाढली आहे.
मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी उत्पादनांचे नुकसान झाले, तर अनेक ठिकाणी पाऊस नसल्याने उत्पादनच निघाले नसल्याने किमती वाढल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून महागाई वाढली आहे. ग्राहक अन्न किंमत निर्देशांक (सीपीआय) जूनमध्ये ४.४९ टक्केवर पोहोचला आहे. मे महिन्यात तो २.९६ टक्के होता, तर एप्रिलमध्ये तो ३.८४ टक्के राहिला होता. हा निर्देशांक खाद्यपदार्थांच्या किमतीतील वाढ आणि घट दर्शवतो. सीपीआय बास्केटमध्ये अन्नपदार्थांचा वाटा जवळपास निम्मा असतो. जूनमध्ये महागाई वाढली असली तरीही ती रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेल्या ६ टक्केपेक्षा कमी आहे.
महागाई
शहर ४.९६% । ग्रामीण ४.७२%
काय स्वस्त? काय महाग?
वस्तू मे जून
अन्नधान्य १२.६५% १२.७१%
दूध ८.९१% १.४१%
खाद्यतेल -१६.०१% -१८.१२%
फळे ०.७०% १.३६%
डाळी ६.५६% १०.५३%
मसाले १७.९०% १९.१९%
महागाईची स्थिती
महिना किरकोळ दर
जुलै २२ ६.७०%
ऑगस्ट २२ ७.००%
सप्टेंबर २२ ७.४१%
ऑक्टोबर २२ ६.७७%
नोव्हेंबर २२ ५.८८%
डिसेंबर २२ ५.७२%
जानेवारी २३ ६.५२%
फेब्रुवारी २३ ६.४४%
मार्च २३ ५.६६%