महागाईने सर्वांना त्रास; मात्र भारतात मंदी नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 12:35 PM2022-07-28T12:35:13+5:302022-07-28T12:35:51+5:30
ब्लूमबर्गचा अहवाल; बड्या अर्थव्यवस्थांवर मंदीचे संकट
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : महागाईने नागरिक हैराण झालेले असतानाही भारतवगळता इतर आशियाई देशांमध्ये मंदीची शक्यता अधिक असल्याचे ब्लूमबर्गच्या अहवालात म्हटले आहे. चीन, जपान, अमेरिका, ब्रिटनसह इतर युरोपीय देशांना यापूर्वीच मोठ्या आर्थिक मंदीचा इशारा देण्यात आला आहे.
तज्ज्ञानी दिलेल्या माहितीनुसार, सतत वाढत असलेल्या महागाईमुळे जगभरातील प्रमुख केंद्रीय बँका व्याजदरात मोठी वाढ करत आहेत. त्यामुळे महागाई आणखी वाढत आहे. यामुळे अनेक देश मंदीच्या छायेत आले आहेत.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताच्या विकास दराच्या अंदाजात घट केली आहे. आयएमएफने म्हटले की, २०२२-२३ मध्ये देशाचा जीडीपी ७.४ टक्के दराने वाढेल, जो पूर्वी ८.२ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. यांच्यावर मंदीची छाया ४० टक्के अमेरिकेत मंदी येण्याची शक्यता असून, तसा इशारा जगभरातील अर्थतज्ज्ञांनी दिला आहे. ५० ते ५५ टक्क्यांपर्यंत युरोपमध्ये आर्थिक मंदी येण्याची शक्यता.
या देशांमध्ये अधिक महागाई
व्हेनेझुएलामध्ये सध्या महागाई प्रचंड असून, ती तब्ब्ल १६७ टक्क्यांवर पोहोचली आहे, तर तुर्कीमध्ये ७८.६ टक्के, अर्जेंटिनामध्ये ६४ टक्के, रशियामध्ये १५.९ टक्के, पोलंडमध्ये १५.५ टक्के, ब्राझीलमध्ये ११.९ टक्के आणि स्पेनमध्ये १०.२ टक्के महागाईचा दर आहे.
सर्वांत आनंदी देशांनाही फटका
सर्वात आनंदी देश म्हणून ओळख असलेल्या फिनलँडलाही सध्या महागाईचा फटका बसला आहे. फिनलँडमध्ये महागाई ७.८ टक्के आहे. थायलंडमध्ये ७.७ टक्के, जर्मनीमध्ये ७.७ टक्के, दक्षिण अफ्रिकामध्ये ७.४ टक्के महागाई आहे.
विकसित
देशांतील महागाई
ब्रिटन ९.४%
अमेरिका ९.१%
आयर्लंड ९.१%
पोर्तुगाल ८.७%
स्विडन ८.७%
नेदरलँड ८.६%
युरोपीय देश ८.६%
कॅनडा ८.१%
आशियाई देशांमधील महागाई
जपान २.२%
तैवान २.३%
चीन २.५%
इंडोनेशिया ४.४%
सिंगापूर ५.६%
दक्षिण कोरिया ६.० फिलिपिन्स ६.१%
भारत ७.०१%