महागाईच्या मुद्याने अधिवेशन तापणार

By Admin | Published: July 6, 2014 01:49 AM2014-07-06T01:49:40+5:302014-07-06T01:49:40+5:30

येत्या संसदीय अधिवेशनादरम्यान महागाईच्या मुद्यावर मोदी सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली आह़े

The inflation session will be the reason for inflation | महागाईच्या मुद्याने अधिवेशन तापणार

महागाईच्या मुद्याने अधिवेशन तापणार

googlenewsNext
नवी दिल्ली : येत्या संसदीय अधिवेशनादरम्यान महागाईच्या मुद्यावर मोदी सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली आह़े ताज्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने महागाईच्या मुद्याला निवडणूक मुद्दा बनवला होता़ आता याच मुद्यावरून चर्चेची मागणी विरोधकांनी केली आह़े
येत्या 7 तारखेपासून मोदी सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आह़े ते 14 ऑगस्टर्पयत चालेल़ यादरम्यान सुमारे 168 तास कामकाज चालेल़ अधिवेशनापूर्वी शनिवारी लोकसभा अध्यक्षांनी  परंपरागत सर्वपक्षीय बैठक बोलवली़ काँग्रेसला लोकसभेचे विरोधी पक्ष नेतेपद देण्यावर या बैठकीत कुठलाही निर्णय होऊ शकला नाही़ लोकसभाध्यक्ष सुमित्र महाजन यांना याबाबत छेडले असता, त्यांनी उत्तर देणो टाळल़े लोकसभा उपाध्यक्षांनी याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला़ आजची बैठक सभागृहाच्या कामकाजासंदर्भात होती, असे उत्तर त्यांनी दिल़े पंतप्रधान             नरेंद्र मोदी हेही बैठकीला हजर         होत़े मात्र त्यांनी मीडियाशी बोलणो टाळल़े
 543 सदस्यीय लोकसभेत विरोधी पक्षनेतेपदाचा दर्जा मिळविण्यासाठी त्या पक्षाजवळ कमीत कमी 55 (लोकसभेच्या एकूण संख्याबळाच्या 1क् टक्के खासदार) सदस्य असणो गरजेचे आह़े तथापि 16 व्या लोकसभेत काँग्रेसकडे केवळ 44 खासदार आहेत़(लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षांनी महागाई, रेल्वे भाडेवाढ, तामीळ मच्छीमारांच्या समस्या, संघर्षरत इराकमध्ये फसलेले भारतीय अशा अनेक मुद्यांवर चर्चेची मागणी केली आहे, अशी माहिती संसदीय कामकाजमंत्री एम़ व्यंकय्या नायडू यांनी दिली़ सरकार सर्व मुद्यांवर चर्चेस तयार आह़े त्यामुळे सर्व विरोधकांनी संसदेचे कामकाज सुरळीत चालू द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केल़े
मागच्या रांगेतील सदस्याची प्रतिमा पडद्यावर दिसणार
4या अधिवेशनात प्रथमच लोकसभेतील कामकाजादरम्यान एक नवी सुविधा सुरू होत आह़े त्याअंतर्गत सभागृहात मागच्या पंक्तींमधील एखादा सदस्य आपले मत मांडत असल्यास, त्याची प्रतिमा सभागृहात समोर लागलेल्या स्क्रीनवर दिसेल़ यामुळे समोरच्या पंक्तीत बसलेल्या सदस्यांना मागे वळून बघावे लागणार नाही़ स्क्रीन बघून कोण बोलत आहे, हे त्यांना कळेल़

 

Web Title: The inflation session will be the reason for inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.