मोदींच्या ‘बीए’ची माहिती द्या!
By admin | Published: May 6, 2016 05:32 AM2016-05-06T05:32:05+5:302016-05-06T05:32:05+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यशास्त्रातील बी.ए. आणि एम.ए. या पदव्यांच्या खरेपणाबद्दल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गंभीर शंका उपस्थित केली असून, मोदी खरंच बी.ए. झाले
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यशास्त्रातील बी.ए. आणि एम.ए. या पदव्यांच्या खरेपणाबद्दल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गंभीर शंका उपस्थित केली असून, मोदी खरंच बी.ए. झाले असतील तर त्याचा तपशील दिल्ली विद्यापीठाने त्यांच्या वेबसाईटवर जाहीर करावा, अशी मागणी केली आहे.
त्यांच्या पदवीसंबंधी विद्यापीठाकडे कोणतीही माहिती असल्याचे दिसत नाही. बी.ए. न होताच मोदी गुजरात विद्यापीठातून एम.ए. कसे झाले, असा प्रश्न त्यांनी केला.
माहिती आयोगाचा आदेश
मोदी यांच्या पदव्यांसंबंधीची माहिती दिल्ली व गुजरात विद्यापीठांनी ‘आरटीआय’अन्वये उपलब्ध करून द्यावी. विद्यापीठांना ही माहिती शोधणे सुलभ व्हावे यासाठी पंतप्रधान कार्यालयाने मोदींनी कोणती परीक्षा केव्हा दिली याचा तपशील उपलब्ध करून द्यावा, असा आदेश केंद्रीय माहिती आयुक्त श्रीधर श्रीनिवासुलु यांनी २९ एप्रिल रोजी केजरीवाल यांच्या अर्जावर दिला होता. आयोगाच्या औपचारिक आदेशाची वाट न पाहता गुजरात विद्यापीठाने माहिती जाहीर केली. पण दिल्ली विद्यापीठाने अद्याप माहिती दिलेली नाही.